Tata Elxsi Q3: डिझाईन आणि टेक्नॉलॉजी सेवा पुरवणारी कंपनी Tata Elxsi नं मंगळवारी त्यांचं Q3FY24 निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 206.4 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीला 194.6 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीचा महसूल 817.7 कोटी रुपयांवरून वार्षिक आधारावर 914.2 कोटी रुपये झाला.
सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 3 टक्क्यांनी वाढून 200.2 कोटी रुपये झाला. कंपनीच्या ऑपरेशन्स महसूलात तिमाही-दर-तिमाही 3 टक्क्क्यांची वाढ झाली, जी Q2FY24 दरम्यान, 881.6 कोटी रुपये होती. मार्च-डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांच्या कालावधीत Tata Elxsi चा निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 595.3 कोटी रुपये झाला आहे, जो डिसेंबर 2022 मध्ये 553.6 कोटी रुपये होता.
ऑपरेशन्समधून महसूल डिसेंबर 2022 मध्ये 2,355 कोटी रुपयांवरुन मार्च-डिसेंबर 2023 या कालावधीत 2,734.5 कोटी रुपये इतका वाढला. त्यात 16 टक्क्यांची वाढ झाली.
कशी आहे शेअर्सची स्थिती?
टाटा समूहाचा हा शेअर मंगळवारी 2 टक्क्यांनी घसरला आणि 8,192 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत त्यात 6 टक्के आणि एका महिन्यात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा स्टॉक सहा महिन्यांत 12.89 टक्के आणि एका वर्षात 23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
कंपनीच्या शेअर्समध्ये पाच वर्षांत 797.46 टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात त्याची किंमत 912 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. या शेअरचा कमाल परतावा 23,305.71 टक्के आहे. दीर्घ मुदतीत, हा शेअर 35 रुपयांवरून (1 जानेवारी 1999 ची अखेरची किंमत) मंगळवारी 8,192 रुपयांपर्यंत वाढला. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 9,191.10 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 5,883.05 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 51,027.14 कोटी रुपये आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)