Lokmat Money >शेअर बाजार > PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा...

PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा...

PSU India Bank Stock to Buy : ब्रोकरेजने या शेअरला बाय रेटिंग दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 09:01 PM2024-07-21T21:01:15+5:302024-07-21T21:03:04+5:30

PSU India Bank Stock to Buy : ब्रोकरेजने या शेअरला बाय रेटिंग दिली.

PSU India Bank Stock to Buy PSU Bank shares will go up to ₹700; Gave more than 300 percent returns in three years | PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा...

PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा...

PSU Bank Stock to Buy : येत्या 23 जुलै रोजी देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पावर शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे. अर्थसंकल्पात विकासाला चालना देणारी धोरणे कायम राहण्याची अपेक्षा आहे. इतरही अनेक घटक बाजाराच्या दिशेवर परिणाम करतील. यामध्ये कंपन्यांचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल, देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटा आणि मोठ्या प्रमाणावर जागतिक बाजाराचा कल यांचा समावेश आहे. या बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने PSU बँक इंडियन बँकेत (Indian Bank) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजनुसार, गुंतवणूकदारांना PSU बँक स्टॉकमध्ये 25 टक्के परतावा मिळू शकतो.

इंडियन बँक शेअरची टार्गेट प्राइस
ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने PSU बँक इंडियन बँकेला BUY रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजने या शेअरची टार्गेट प्राइस 700 रुपये प्रति शेअर ठेवली आहे. 19 जुलै 2024 रोजी स्टॉक 1.35 टक्क्यांनी घसरुन 560.70 च्या पातळीवर बंद झाला होता. आता या किमतीच्या पुढे स्टॉक 25 टक्क्यांनी वाढू शकतो, असा ब्रोकरेजला अंदाज आहे. ICICI डायरेक्ट अहवालानुसार, इंडियन बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांपैकी एक आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ₹ 12 लाख कोटींहून अधिक आहे. 

इंडियन बँकेच्या शेअरचा इतिहास
गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 27 टक्के आणि 2024 मध्ये आतापर्यंत 33 टक्क्यांनी वाढला आहे. तर, गेल्या एका वर्षात स्टॉक 72 टक्क्यांनी, दोन वर्षांत 220 टक्क्यांनी आणि गेल्या तीन वर्षांत 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 626.35 आहे, तर नीचांक 325 आहे. या PSU बँकेचे मार्केट कॅप 75,524.27 कोटी रुपये आहे.

टीप : शेअर खरेदीचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे. ही लोकमतची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: PSU India Bank Stock to Buy PSU Bank shares will go up to ₹700; Gave more than 300 percent returns in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.