Join us  

Gautam Adani : ‘या’ कंपनीत अदानी खरेदी करू शकतात हिस्सा, शेअर्सनं पकडला वेग; पुन्हा अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 2:55 PM

कंपनीच्या शेअर्सला आज सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागले आहे.

पीटीसी इंडिया (पीटीसी इंडिया) च्या शेअर्सला आज सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागले आहे. त्यानंतर पीटीसी इंडियाच्या शेअर्सची किंमत बीएसईमध्ये 91.80 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. काल म्हणजेच सोमवारीही कंपनीच्या शेअर्सना पाच टक्क्यांचे अपर सर्किट लागले होते. जेव्हापासून अदानी समूह यातील हिस्सा खरेदी करू शकतो ही असे वृत्त समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली आहे.

एनटीपीसी, एनएचपीसी, पॉवर ग्रीड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा या कंपनीत 4-4 टक्के हिस्सा आहे. या कंपन्या त्यांचे स्टेक विकू शकतात. ईटीच्या रिपोर्टनुसार या महिन्याच्या अखेरीस निविदा मागवल्या जाऊ शकतात. तथापि, PTC इंडियाने प्रमोटर्सद्वारे हिस्सा विकण्याच्या प्रश्नावर कोणतीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.

शेअर मार्केटमधील कामगिरी कशी?अदानी समूहाने पीटीसी इंडियामधील हिस्सा विकत घेतल्यास कंपनी ऊर्जा क्षेत्रातही वर्चस्व निर्माण करेल. पीटीसी इंडियाची सुरुवात 1999 मध्ये झाली होती. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 1.66 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोणत्याही गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी यात गुंतवणूक केली असेल तर त्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न मिळाले असतील. NSE मध्ये कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 114.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 67.50 रुपये आहे. 

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजार