Pune E-Stock Broking Listing: पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचा आयपीओ आज शुक्रवारी बीएसईवर लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स 57% प्रीमियमवर शेअर बाजारात लिस्ट झाले. हे शेअर्स बीएसईवर 130 रुपयांना लिस्ट झाले. कंपनीच्या आयपीओदरम्यान याची प्राईज बँड ₹78 ते ₹83 निश्चित करण्यात आली होती. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 7 मार्च ते 12 मार्च पर्यंत खुला होता. त्याच्या एका लॉट साइजमध्ये 1,600 शेअर होते, गुंतवणूकदारांना किमान 1,600 शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकणार होते.
काय आहेत अधिक तपशील?
₹ 38.23 कोटीच्या या इश्यूच्या विक्रीसाठी कोणतीही ऑफर देण्यात आली नव्हती, हा पूर्णपणे फ्रेश इश्यू होता. या IPO मधील 50 टक्के पेक्षा जास्त शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (QIBs), 15 टक्के नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्ससाठी (NIIs) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होते. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग IPO चे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड होते. तर बुक रनिंग लीड मॅनेजर शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि मार्केट मेकर शेअर इंडिया सिक्युरिटीज आहे.
कंपनीच्या बाबतीत माहिती
पुणे ई-स्टॉक ब्रोकरेज लिमिटेड ही कॉर्पोरेट ब्रोकरेज ट्रेडिंग कंपनी आहे. ती आपल्या ग्राहकांना स्टॉक एक्सचेंजसह इक्विटी, फ्युचर्स आणि ऑप्शन्स, करन्सी आणि कमोडिटीजचा व्यापार करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करते. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंगचे प्रवर्तक संदीप सुंदरलाल शाह, परेश सुंदरलाल शाह, दैदिप्या घोडनाडीकर, वृजेश नवनीतभाई शाह, देवेंद्र रामचंद्र घोडनाडीकर आणि वृजेश कृष्णकुमार शाह आहेत.(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)