Share Market News : शेअर मार्केटची गुंतवणूक जोखमीची आहे, पण कधी-कधी असा एखादा शेअर हाता लागतो, जो गुंतवणूकदारांना मालामाल करतो. 'राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स' या छोट्या कंपनीचा शेअर दीर्घकाळात मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने गेल्या 8 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 5500% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीचे 8 वर्षात 57 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.
1 लाखाचे झाले 57 लाख...'राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स'चे शेअर्स 26 ऑगस्ट 2016 रोजी 21.25 रुपयांवर होते, जे 2 सप्टेंबर 2024 रोजी 1229.95 रुपयांवर आले आहेत. 'राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स'च्या शेअर्सने गेल्या 8 वर्षांत 5500% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने 26 ऑगस्ट 2016 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आता त्याला 57.88 लाख रुपये मिळतील. यात कंपनीने दिलेले बोनस शेअर्स आणि लाभांश समाविष्ट नाही. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1236 रुपये आहे, तर 52 नीचांक 485 रुपये आहे.
अनेक दिग्गजांची गुंतवणूकविशेष म्हणजे, दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स'चे 11,43,852 शेअर्स किंवा कंपनीत 4.98% हिस्सा आहे. तर, आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे 4,63,366 शेअर्स किंवा 2.02% हिस्सा आहे. दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांच्याकडेही कंपनीचे 3,56,148 शेअर्स आहेत.
दोनवेळा बोनस शेअर्स दिले'राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स'ने गेल्या 8 वर्षांत दोनवेळा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरित केले आहेत. कंपनीने मे 2018 मध्ये 2:5 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 5 शेअर्समागे 2 बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने ऑगस्ट 2023 मध्येही 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस शेअर दिला.
(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)