Join us

Rahul Gandhi Portfolio : मोदी 3.0 मध्ये राहुल गांधी मालामाल; शेअर बाजारातून दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:01 PM

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधींकडे सध्या 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

Rahul Gandhi Portfolio : हिंडनबर्ग रिसर्चने गौतम अदानी आणि SEBI प्रमुखांवर केलेल्या आरोपांमुळे शेअर बाजाराची देशभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, देशातील असंख्य लोक या शेअर बाजारातून महिन्याला हजारो-लाखो रुपयांची कमाई करतात. यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांनी शेअर बाजारातील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कट्टर टीकाकार Modi 3.0 मध्ये मालामाल झाले आहेत. 

राहुल गांधींची दरमहा 9 लाखांहून अधिकची कमाईमीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी दरमहा 9 लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. तर, गेल्या 5 महिन्यांत राहुल गांधींनी त्यांच्या पोर्टफोलिओमधून 46.49 लाख रुपये कमावले आहेत. 15 मार्च 2024 पर्यंत राहुल गांधींचा पोर्टफोलिओ 4.33 कोटी रुपयांचा होता, जो 12 ऑगस्ट रोजी 4.80 कोटींवर पोहोचला आहे. 

राहुल यांच्याकडे 24 स्टॉक, 4 तोट्यात राहुल गांधी यांच्याकडे एशियन पेंट्स, बजाज पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅब्स, जीएमएम फोडलर, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस, टायटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया आणि एलटीआय माइंडट्री यासह 24 कंपन्यांचे शेअर्स आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमधील LTI Mindtree, TCS, Titan आणि Nestle India चे शेअर्स तोट्यात आहेत.

छोट्या कंपन्यांचे शेअर्सही चर्चेत राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक छोट्या कंपन्यांचेही शेअर्स आहेत. यामध्ये व्हर्टोस ॲडव्हर्टायझिंग आणि विनाइल केमिकल्ससारख्या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी Vertos Advertising बद्दल खूप चर्चा झाली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 260 शेअर्स होते. मात्र, स्टॉक स्प्लिट आणि बोनसमुळे त्यांच्याकडे आता 5200 शेअर्स आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवे विक्रम केले आहेत. याचा फायदा राहुल गांधी यांनाही होत आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :राहुल गांधीशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकनरेंद्र मोदी