Lokmat Money >शेअर बाजार > रेल्वेच्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, एका वर्षात दिला 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांची चांदी

रेल्वेच्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, एका वर्षात दिला 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांची चांदी

कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 199.35 रुपये तर निचांक 32.80 रुपये आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 12:09 AM2023-09-20T00:09:27+5:302023-09-20T00:11:21+5:30

कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 199.35 रुपये तर निचांक 32.80 रुपये आहे. 

rail vikas nigam limited share has taken rocket speed, gave more than 400 percent return in one year | रेल्वेच्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, एका वर्षात दिला 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांची चांदी

रेल्वेच्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, एका वर्षात दिला 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांची चांदी

सरकारी रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेडचा (RVNL) शेअर 20 सप्टेंबरला एक्स-डिव्हिडेंडवर ट्रेड करेल. कंपनीने याच वर्षाच्या 29 मे रोजी 0.36 रुपये प्रति शेअर फायनल डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर, हा शेअर बीएसईवर 36 टक्के म्हणजेच 43.75 रुपयांनी वधारला आहे. हा पीएसयू स्टॉक 29 मे, 2023 रोजी 121.55 रुपयांवर बंद झाला होता. तसेच, सोमवारी हा शेअर 2.96 टक्क्यांनी घसरून 165.30 रुपयांवर बंद झाला.

एका वर्षांत 400 टक्क्यांहून अधिकचा परतावा -
सोमवारी इंट्राडे ट्रेड दरम्यान हा स्टॉक 3.69 टक्क्यांनी घसरून 164.05 रुपयांपेक्षाही खालच्या पातळीवर घसरला. RVNL चा शेअर गेल्या 1 वर्षात जवळपास 401 टक्क्यांनी वधारला आहे.  कंपनीचा शेअर 29 सप्टेंबर, 2022 रोजी BSE वर 32.95 रुपयांवर होता. तर 18 सप्टेंबर, 2023 रोजी तो 165.30 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 199.35 रुपये तर निचांक 32.80 रुपये आहे. 

कंपनीचा परफॉर्मन्स -
चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत आरव्हीएनएलने आपल्या कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक बेसिसवर 15 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 297.6 कोटी रुपयांवरून 343 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षात कंपनीचा महसून वार्षिक आधारावर 20% वाढून 5853.2 कोटी रुपये झाला आहे. जो गेल्या वर्षी याच कालावधीत 4,640.7 कोटी रुपये होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: rail vikas nigam limited share has taken rocket speed, gave more than 400 percent return in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.