Join us

रेल्वेचा 'हा' शेअर भरतोय खिसा, सलग नवव्या दिवशी अपर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:42 PM

कंपनीच्या शेअर्समध्ये सुरु असलेला वाढीचा कल कायम आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी.

ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर (ORIL) या रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये सुरु असलेला वाढीचा कल कायम आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअरला पुन्हा एकदा पाच टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. हा कामकाजाचा सलग नववा दिवस आहे जेव्हा शेअरला अपर सर्किट लागलं. बुधवारी कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 247 रुपयांवर बंद झाला. हा शेअरचा  52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे.

डिसेंबर महिन्यात आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 123 रुपयांवरून जवळपास 91 टक्क्यांनी वाढली आहे. मे 2023 मध्ये शेअर 33.50 रुपयांवर होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. जर आपण सध्याच्या किंमतीवर नजर टाकली तर या समभागाने गेल्या सहा महिन्यांत 454 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. स्टॉकने सहा महिन्यांच्या कालावधीत 454 टक्के परतावा दिला आणि तीन महिन्यांत 180 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच म्हणजे 21 डिसेंबर रोजी पार पडली.

मिळाली मोठी ऑर्डरओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला अलीकडेच भारतीय रेल्वेकडून 485 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत, कंपनी 1,200 BOXNS वॅगनचे उत्पादन आणि पुरवठा करेल. ऑर्डर 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

आर्थिक स्थिती कशी?ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं तर, वर्ष दर वर्षाच्या हिशोबानं 96 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या महसूलात सप्टेंबर तिमाहीत वाढ होऊन तो 58.29 कोटींवरून 114.76 कोटी रुपये झाला. जून तिमाहीत महसुलात 92.81 कोटी रुपयांच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय कंपनीच्या नफ्यात वर्ष दर वर्ष हिशोबानं 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रवर्तकाकडे कंपनीमध्‍ये 57.85 टक्के हिस्सा आहे, तर सर्वसामान्य लोकांचा यामध्ये 42.15 टक्‍के हिस्सा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजार