Budget 2024
Lokmat Money >शेअर बाजार > Railway PSU Stocks मध्ये बजेट २०२४ पूर्वी जबरदस्त तेजी, आठवड्याभरात ५५ टक्क्यांची वाढ

Railway PSU Stocks मध्ये बजेट २०२४ पूर्वी जबरदस्त तेजी, आठवड्याभरात ५५ टक्क्यांची वाढ

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ३ लाख कोटी रुपयांच्या घोषणेची शक्यता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:19 PM2024-01-20T13:19:03+5:302024-01-20T13:21:00+5:30

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ३ लाख कोटी रुपयांच्या घोषणेची शक्यता.

Railway PSU Stocks Bullish Ahead of Budget 2024 Up 55 Percent in Week share price Rail Vikas Nigam Limited Indian Railway Finance Corporation | Railway PSU Stocks मध्ये बजेट २०२४ पूर्वी जबरदस्त तेजी, आठवड्याभरात ५५ टक्क्यांची वाढ

Railway PSU Stocks मध्ये बजेट २०२४ पूर्वी जबरदस्त तेजी, आठवड्याभरात ५५ टक्क्यांची वाढ

Railway PSU Stocks: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. परंतु अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. विशेषत: सरकारी रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये एका दिवसात १०-१५ टक्क्यांनी वाढ होताना दिसतेय.. हे स्टॉक्स एका आठवड्यात ५५ टक्क्यांपर्यंत आणि एका महिन्यात ९० टक्क्यांपर्यंत वाढलेत. IRFC ही पहिली रेल्वे कंपनी ठरली आहे जिचं मार्केट कॅप २ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. शनिवारीही या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Ircon International Share Price

ट्रेडिंगच्या पहिल्या दोन तासांत, इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर १५ टक्क्यांनी वाढून २६१ रुपयांच्या नवीन आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. हा शेअर एका आठवड्यात ३२ टक्के, एका महिन्यात ६० टक्के आणि तीन महिन्यांत ६७ टक्क्यांनी वाढला आहे. रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचं काम ही कंपनी करते.

RVNL Share Price

रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरला १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आहे आणि तो ३२० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. हा शेअर एका आठवड्यात ५७ टक्के, एका महिन्यात ८६ टक्क्यांनी वाढला आहे.

IRFC Share Price

IRFC चे म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी कंपनी आहे. कंपनीच्या शेअर्सना १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं असून ते १७६ रुपयांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. हा शेअर एका आठवड्यात ५५ टक्के, एका महिन्यात ९० टक्के आणि तीन महिन्यांत १२८ टक्क्यांनी वाढला आहे.

Railtel Share Price

RailTel Corporation भारतीय रेल्वेसाठी दूरसंचार सेवा पुरवते. या शेअरला १५ टक्क्यांच्या वाढीसह ४५४ रुपयांवर अपर सर्किटमध्ये लागलं आहे. हा शेअर एका आठवड्यात २५ टक्के, एका महिन्यात ५५ टक्के आणि तीन महिन्यांत ९० टक्क्यांनी वाढला आहे.

३ लाख कोटींची घोषणा शक्य

असं मानलं जात आहे की २०२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी पुन्हा मेगा एक्सपेंडेचरची घोषणा केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बजेट ३ लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. २०२३ च्या अर्थसंकल्पात २.४ लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही रेल्वेसाठी मोठी योजना असल्याचं सांगितलं होतं.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Railway PSU Stocks Bullish Ahead of Budget 2024 Up 55 Percent in Week share price Rail Vikas Nigam Limited Indian Railway Finance Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.