Lokmat Money >शेअर बाजार > Railway Stocks : रेल्वेशी संबंधित कंपन्या प्रॉफिट बुकींगच्या बळी; शेअर्स १८ टक्क्यांपर्यंत आपटले, तेजीला ब्रेक

Railway Stocks : रेल्वेशी संबंधित कंपन्या प्रॉफिट बुकींगच्या बळी; शेअर्स १८ टक्क्यांपर्यंत आपटले, तेजीला ब्रेक

रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:39 PM2024-01-23T14:39:26+5:302024-01-23T14:39:40+5:30

रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण दिसून आली.

Railway related companies profit booking Shares fall by 18 percent break the rally | Railway Stocks : रेल्वेशी संबंधित कंपन्या प्रॉफिट बुकींगच्या बळी; शेअर्स १८ टक्क्यांपर्यंत आपटले, तेजीला ब्रेक

Railway Stocks : रेल्वेशी संबंधित कंपन्या प्रॉफिट बुकींगच्या बळी; शेअर्स १८ टक्क्यांपर्यंत आपटले, तेजीला ब्रेक

Railway Stock: रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांनी मंगळवारी रेल विकास निगमपासून रेल टेलपर्यंत अनेक कंपन्यांचे शेअर्स विकले. गेल्या काही दिवसांपासून या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. दरम्यान, आता अर्थसंकल्पाची तारीख जवळ आली आहे. या कारणास्तव, गेल्या काही आठवड्यात रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत होती.

रेल विकास निगम

कंपनीच्या शेअर्सना आज 10 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं होतं. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स 288.70 रुपयांपर्यंत घसरले. दुपारी 1 च्या सुमारास बीएसईमध्ये हा शेअर 293 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या 6 महिन्यांत रेल विकास निगमच्या शेअर्समध्ये 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Ircon

शेअर बाजारातील या शेअरची अवस्था मंगळवारी बिकट झाली होती. मंगळवारी रेल्वेचा हा मल्टीबॅगर शेअर 18.66 टक्क्यांनी घसरला. बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत दुपारी 1 वाजता 237 रुपये होती. गेल्या एका वर्षात रेल्वेच्या या शेअरनं पोझिशनल गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा दिला आहे.

Railtel

या रेल्वेच्या शेअरची स्थिती इतर कंपन्यांसारखीच आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणारा हा शेअर आज 12 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. रेलटेलच्या एका शेअरची किंमत दुपारी ३९२ रुपये होती. तर इंट्रा-डे नीचांकी पातळी प्रति शेअर 383 रुपये होती. या शेअरची किंमत 6 महिन्यांत 146 टक्क्यांनी वाढली आहे.

IRFC

IRFC ची स्थितीही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी नाही.  मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बीएसईवर दुपारी 1 वाजता कंपनीचे शेअर्स 163 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. गेल्या 6 महिन्यांत या रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )

Web Title: Railway related companies profit booking Shares fall by 18 percent break the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.