Join us  

RVNL किंवा IRFC नाही तर, रेल्वेचा 'हा' शेअर १० भागांत विभागला जाणार, जाणून घ्या अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 11:21 AM

KR Rail Engineering Ltd Share Price: रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी केली आहे. आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती कंपनी IRFC किंवा RVNL नाही. जाणून घेऊ अधिक माहिती.

KR Rail Engineering Ltd Share Price: रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी केली आहे. चमकदार कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे रेल विकास निगम आहे. त्यानंतर जर कुणाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे आयआरएफसी. पण आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती कंपनी म्हणजे के अँड आर रेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी. दीर्घ मुदतीत या कंपनीनं गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक तेजीसह बंद झाले. मात्र सोमवारी या कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये चढ उतार दिसून आले.

बीएसई कंपनीचा शेअर शुक्रवारी ४४०.१० रुपयांवर उघडला. पण काही काळानंतर कंपनीचा शेअर ५.४४ टक्क्यांनी वधारून ४७४.७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र, शुक्रवारी कामकाजाच्या अखेरिस कंपनीचा शेअर ३.५६ टक्क्यांनी वधारून ४६६.३० रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे सोमवारी मात्र यात कामकाजादरम्यान यात चढ उतार दिसून आले.

१० भागांत स्प्लिट होणार

कंपनीच्या १३ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा मल्टिबॅगर स्टॉक १० भागांमध्ये स्प्लिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीच्या शेअर्सच्या स्प्लिटनंतर स्टॉकची फेस व्हॅल्यू १० रुपयांवरून १ रुपयांपर्यंत खाली येईल. कंपनीकडून शेअर्सच्या स्प्लिटची घोषणा करण्यात आलेली नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घोषणेपासून ३ महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

३ वर्षांत १७०० टक्के रिटर्न

२ ऑगस्ट २०२१ रोजी या रेल्वे शेअरची किंमत २५.४५ रुपये होती. पण त्यानंतर शेअरच्या किंमतीत १७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी मागील वर्ष चांगलं गेलं नाही. या काळात केआर रेल इंजिनीअरिंग लिमिटेडच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. शेअर्स स्प्लिट करणाऱ्या या शेअरची किंमत १८ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. तर, गेल्या ६ महिन्यांत या रेल्वे शेअरच्या किंमतीत ३६ टक्क्यांची घसरण झाली आहे.

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८६३.३५ रुपये असून ५२ आठड्यांचा नीचांकी स्तर ४१४ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९८७.२० कोटी रुपये आहे.(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजाररेल्वे