Join us  

Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय; RVNL सह 'या' शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:46 AM

Railway Stock Price: अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मोदी सरकार रेल्वेसंदर्भात सुरू असलेली जुनी धोरणं कायम ठेवणार आहे. त्याचा परिणाम रेल्वे क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून आला आहे.

Railway Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या मंत्र्यांच्या खात्यांचं वाटप केलं. अनेक चर्चा सुरू असतानाही पुन्हा एकदा अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, मोदी सरकार रेल्वेसंदर्भात सुरू असलेली जुनी धोरणं कायम ठेवणार आहे. त्याचा परिणाम रेल्वे क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून आला आहे. रेल विकास निगम, आयआरएफसीसह अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

इंडियन रेल्वे फाइनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC Ltd Share Price) 

आज बीएसईमध्ये कंपनीचा शेअर १७५.५५ रुपयांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर बीएसईवर कंपनीचा शेअर २.७४ टक्क्यांनी वधारून १७७.८५ रुपयांवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

रेल विकास निगम लिमिटेड (RVNL Share Price) 

बीएसईवर कंपनीचा शेअर ३८२ रुपयांवर उघडला. कंपनीचा शेअर आज कामकाजादरम्यान ३.७९ टक्क्यांनी वधारून ३८८ रुपयांवर पोहोचला. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १२४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON International Ltd) 

कामकाजाच्या सुरुवातीला हा शेअर २५५.९० रुपयांवर उघडला. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५.३२ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक २६५ रुपये आहे. गेल्या ६ महिन्यांत या शेअरच्या किंमतीत ६४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

तितागड रेल्वे सिस्टम लिमिटेड  (Titargarh Rail Systeam Ltd) 

आज हा रेल्वे शेअर १३४७.९५ रुपयांच्या पातळीवर उघडला. ज्यानंतर कंपनीच्या शेअरची किंमत २.६४ टक्क्यांनी वधारली होती. गेल्या ६ महिन्यांत या शेअरच्या किंमतीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर वर्षभरात २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारअश्विनी वैष्णवगुंतवणूकरेल्वे