गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअरमध्ये बुधवारी 5% ची तेजी दिसून आली. यानंतर, शेअरला अप्पर सर्किट लागले आणि तो 14.86 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला. खरे तर, गुजरात टूलरूम लिमिटेडला एक मोठी ऑर्डर मिळाल्याने ही तेजी आली आहे. कंपनीने बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला 1.5 अब्ज रुपयांची (150 कोटी रुपये) एक मोठी आयात-निर्यात ऑर्डर मिळाली आहे. कंपनीसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे आणि चालू तिमाहीत ती पूर्ण होणे अपेक्षा आहे. यामुळे 5 टक्के ते 10 टक्के ऑपरेशनल प्रॉफिट मार्जिन निर्माण होईल.
कंपनीने म्हटले आहे की, "या आंतरराष्ट्रीय ऑर्डर व्यतिरिक्त, आम्ही देशांतर्गत इम्पेक्स संधीच्या शोधत आहोत. येत्या आठवड्यात अतिरिक्त ऑर्डर मळणे अपेक्षित आहे. हा विकास आमची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यासाठी आणि शेअरधारकांचे मूल्य वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो."
अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती -बीएसई अॅनालिटिक्सनुसार, गुजरात टूलरूमच्या शेअरने 2024 मध्ये आतापर्यंत 58.62 टक्क्यांचा निगेटिव्ह परतावा दिला आहे. मात्र, कंपनीचा एका वर्षाचा परतावा 50.71 टक्के आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार करता, या शेअरने 1239 टक्के, गेल्या तीन वर्षांत जवळपास 2151.5 टक्के आणि गेल्या पाच वर्षांत 3438 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. तसेच, गेल्या 10 वर्षांत या शेअरने 11330 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 45.97 रुपये प्रति शेअर तर नीचांक 8.16 रुपये प्रति शेअर एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)