Rajgor Castor Derivatives IPO Listing: कॅस्टर ऑईल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्ह्जच्या शेअर्सची आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री झाली. या आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि हा आयपीओ 107 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत, 50 रुपये दरानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज ते एनएसई एसएमईवर 59 रुपयांवर लिस्ट झाले. याचाच अर्थ आयपीओमधील गुंतवणूकदारांना 18 टक्के (Rajgor Castor Listing Gain) लिस्टिंग गेन मिळाला आहे. दरम्यान, लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान ते 58.30 (Rajgor Castor Share Price) रुपयांवर ट्रेड करत होते.
राजगोर कॅस्टर डेरिव्हेटिव्हजचा 47.81 कोटी रुपयांचा आयपीओ 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओ गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकूणच हा आयपीओ 107.43 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इंस्टिट्युशनल बायर्सचा (QIB) हिस्सा 35.52 पट, नॉन-इंस्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 260.01 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 80.70 पट सबसक्राईब झाला होता.
या आयपीओअंतर्गत, 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले 88.95 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले होते आणि 6.66 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विक्री करण्यात आली. नवीन शेअर्सद्वारे उभारण्यात आलेला पैसा वर्किंग कॅपिटलची गरज, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे आणि आयपीओचा खर्च पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल.
Rajgor Castor च्या शेअर्सचं १८ टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग, १०७ पट सबस्क्राईब झालेला IPO
या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि हा आयपीओ 107 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:50 AM2023-10-31T10:50:05+5:302023-10-31T10:50:23+5:30