Lokmat Money >शेअर बाजार > राकेश झुनझुनवालांनी ज्या कंपनीत केली होती गुंतवणूक, तिच्या शेअर्सनी एकाच वर्षांत घेतलाय रॉकेट स्पीड

राकेश झुनझुनवालांनी ज्या कंपनीत केली होती गुंतवणूक, तिच्या शेअर्सनी एकाच वर्षांत घेतलाय रॉकेट स्पीड

हा शेअर 120 रुपयांच्या वरही जाऊ शकतो. हा शेअर खरेदी करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांनाही याचा फायदा होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:14 PM2022-10-31T23:14:22+5:302022-10-31T23:14:53+5:30

हा शेअर 120 रुपयांच्या वरही जाऊ शकतो. हा शेअर खरेदी करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांनाही याचा फायदा होऊ शकतो.

Rakesh Jhunjhunwala had invested in karur vysya bank, its shares have taken rocket speed in a single year | राकेश झुनझुनवालांनी ज्या कंपनीत केली होती गुंतवणूक, तिच्या शेअर्सनी एकाच वर्षांत घेतलाय रॉकेट स्पीड

राकेश झुनझुनवालांनी ज्या कंपनीत केली होती गुंतवणूक, तिच्या शेअर्सनी एकाच वर्षांत घेतलाय रॉकेट स्पीड

शेअर बाजारातील 'बिग-बूल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आज हयात नाहीत. मात्र, त्यांनी ज्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, तो केवळ एका महिन्यातच 32 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. महत्वाचे म्हणजे, ही केवळ सुरुवात आहे, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्सनी आता रॉकेट स्पीड घेतला आहे. अशात हा शेअर 120 रुपयांच्या वरही जाऊ शकतो. हा शेअर खरेदी करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांनाही याचा फायदा होऊ शकतो.

करूर वैश्य बँकेच्या शेअर्समध्ये केली होती गुंतवणूक - 
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, राकेश झुनझुनवाला यांनी करूर वैश्य बँकेचे शेअर्स खरेदी केले होते. या बँकेचे शेअर्स गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. जर आपण 1 नोव्हेंबर 2021 चा विचार केला, तर त्या काळात बँकेच्या एका शेअरची किंमत 48.55 रुपये होती, जी एका वर्षानंतर 104 रुपये झाली आहे. गेल्या एका वर्षातील बँकेच्या शेअर्सचा हा सर्वोत्तम स्कोर आहे. 

एका वर्षात 114 टक्क्यांनी वाढली किंमत - 
तज्ज्ञांच्या मते, सोमवारी व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी करूर वैश्य बँकेच्या शेअर्सनी 6 टक्क्यांनी उसळी घेतली. तर गेल्या वर्षभरात बँकेच्या शेअर्समध्ये 114 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस शेअर्सच्या किमतीत 125 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. तसेच,  गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअर्सनी 32 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Rakesh Jhunjhunwala had invested in karur vysya bank, its shares have taken rocket speed in a single year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.