Join us  

Rakesh Jhunjhunwala यांच्या फर्मची 'या' कंपनीत गुंतवणूक, आता येणार IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 7:58 PM

IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे.

जर तुम्ही IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे. राकेश झुनझुनवाला फर्म सपोर्टेड कॉनकॉर्ड बायोटेक आणि एक अन्य कंपनी वैभव जेम्स एन ज्वेलर्सचा आयपीओ लवकरच येणार आहे. या दोन्ही कंपन्यांना सेबीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या दोन कंपन्यांच्या IPO बद्दल तपशील जाणून घेऊया -

कॉनकॉर्ड बायोटेक आणि वैभव जेम्स यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान सेबीकडे IPO साठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती. ज्यावर सेबीने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान मंजुरी दिली आहे. दरम्यान, आता यामध्ये गुंतवणूकीची संधी मिळणार आहे.

Concord Biotech IPOड्राफ्ट पेपरनुसार, Concord Biotech चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. कंपनी या IPO द्वारे 2,09,25,652 शेअर्सची विक्री करणार आहे. कॉनकॉर्ड बायोटेक ही बायोफार्मास्युटिकल API कंपनी आहे. Quadria Capital Fund आणि राकेश झुनझुनवाला यांनी स्थापन केलेल्या Rare Enterprises या कंपनीने या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

Vaibhav Gems NJewellersकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 210 कोटी रुपयांचे शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे जारी केले जातील. कंपनी 43 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल म्हणून जारी करणार आहे. कंपनी आयपीओद्वारे उभारलेल्या 12 कोटी रुपयांचा वापर 8 शोरूम उभारण्यासाठी करणार आहे. त्याच वेळी, इन्व्हेंट्रीसाठी 160 कोटी रुपये खर्च केले जातील. विशाखापट्टणमची ही कंपनी सोने, हिरे, रत्ने, प्लॅटिनम आणि चांदीचे दागिन्यांची विक्री करते.

टॅग्स :राकेश झुनझुनवालागुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग