दिग्गज गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईत निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणुकीची पद्धत सुप्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्यासारखीच होती. राकेश झुनझुनवाला यांनाही भारताचे वॉरेन बफे असेही संबोधले जायचे. गुंतवणूकीचा पॅटर्नच नाही, तर क्रिप्टो करन्सी आणि मोठ्या कॅशची गरज असलेल्या नव्या युगात त्यांचे विचारही वॉरन बफे यांच्याशी मिळतेजुळते आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून, झुनझुनवाला क्रिप्टोकरन्सी आणि स्टार्टअप्सपासून दूर राहण्याच्या बाजूने होते. पाहूया यामागील कारण नेमके काय आहे?
वॉरन बफे यांच्याप्रमाणे झुनझुनवाला हेदेखील कंपन्यांसाठी पॉझिटिव्ह कॅश फ्लो च्या महत्त्वावर भर देत होते. राकेश झुनझुनवाला यांनी या वर्षी CNBC TV-18 ला दिलेल्या एका मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या होत्या. जगभरातील बाजारातील शेअर्सची स्थिती आणि दिशा कंपन्यांच्या कॅश फ्लो आणि कमाईवर अवलंबून असते, असे ते म्हणाले होते. व्हॅल्युएशनवर जास्त लक्ष केंद्रित न करता कोणत्याही कंपनीच्या व्यवसायाच्या शक्यता कार्यक्षमता, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तांत्रिक बाबी, बदलांना सामोरे जाण्याची क्षणता यावर अवलंबून असतात. ही एक शर्यत आहे ज्यामध्ये हळूहळू पण लांबपर्यंत चालत कासवच जिंकतो, असे ते आणखी एका मुलाखतीत म्हणाले होते.
कायम्हणालेहोतेस्टार्टअप्सबाबत?
स्टार्टअप्सवर बोलताना ते म्हणाले होते की स्टार्टअप्सनी त्यांच्या बिझनेस मॉडेलवर अधिक भर दिला पाहिजे. मजबूत बिझनेस मॉडेलमधूनच कॅश फ्लो येतो. कंपनीचं व्हॅल्युएशन २-३ अब्ज डॉलर्सपर्यंत करण्याऐवजी त्याचं बिझनेस मॉडेल मजबूत केलं पाहिजे. याच तर्कांच्या आधारे राकेश झुनझुनवाला हे मोठ्या भांडवलाची गरज असलेल्या स्टार्टअप्सपासून दूर राहायचे. मला स्टार्टअपमध्ये भाग घ्यायचा नाही. त्याचा हँगओव्हर केवळ २ दिवस टिकेल, असे एकदा ते स्टार्टअपवर बोलताना म्हणाले होते.
क्रिप्टोकरन्सीबाबत काय म्हणाले?
क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूकीबाबतही झुनझुनवाला फारसे उत्सुक नव्हते. त्यामध्ये रोज होणारे चढ उतार आपल्याला आवडत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. बिटकॉटईन जरी ५ डॉलर्समध्ये मिळाली तरी त्यात गुंतवणूक करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सध्याच्या जगात केवळ सार्वभौम राष्ट्रांनाच चलन छापण्याचा अधिकार आहे. उद्या लोक ५ लाख बिटकॉइन्स देखील बनवू शकतात, असे झुनझुनवाला एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.