Lokmat Money >शेअर बाजार > रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा

रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा

शेअर मार्केटचा वेळ वाढवला. जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 07:54 PM2024-01-19T19:54:12+5:302024-01-19T19:54:59+5:30

शेअर मार्केटचा वेळ वाढवला. जाणून घ्या डिटेल्स...

Ram Mandir, lord rama Pran Pratishtha day Share Market half day off; Announcement by RBI | रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा

रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा


Ram Mandir Share Market: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचा उद्घाटन आणि रामलालाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. केंद्र सरकारने या दिवशी देशभरात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यातच आता 22 जानेवारी रोजी शेअर बाजारदेखील सकाळी 9 ऐवजी दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियने (RBI) शुक्रवारी ही माहिती दिली. 

आरबीआयने केली घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, 22 जानेवारी(सोमवार) रोजी सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार, मनी मार्केटमध्येही(Share Market) अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल. त्यानुसार, सोमवारी सकाळी 9 ऐवजी दुपारी 2.30 वाजता मार्केटचे व्यवहार सुरू होतील आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. 

शनिवारी विशेष ट्रेडिंग सत्र
दरम्यान, प्रमुख स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE शनिवारी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करणार आहे. विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्रामध्ये दोन सत्रे असतील. पहिले सकाळी 9.15 ते सकाळी 10 आणि दुसरे सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत असेल.

Web Title: Ram Mandir, lord rama Pran Pratishtha day Share Market half day off; Announcement by RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.