Lokmat Money >शेअर बाजार > रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

Tata Motors Demerger : टाटा समूहातील मोठी कंपनी टाटा मोटर्सने त्यांचे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:30 IST2025-04-07T17:14:50+5:302025-04-07T17:30:49+5:30

Tata Motors Demerger : टाटा समूहातील मोठी कंपनी टाटा मोटर्सने त्यांचे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ratan Tata's Tata Motors Demerger Why such a big decision? | रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

रतन टाटा यांच्या 'या' कंपनीचे होणार विभाजन! का घेतला इतका मोठा निर्णय?

Tata Motors Demerger : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे निधन होऊन आता जवळपास सहा महिने झाले आहेत. मात्र, तरीही त्यांचे नाव कायम चर्चेत असते. याचं कारण म्हणजे त्यांनी संपूर्ण हयातीत उभं केलेलं टाटा समूहाचे साम्राज्य. रतन टाटा यांनी एकएक कंपनीला आपल्या मुलासारखं सांभाळत मोठं केलं आहे. यात फक्त टाटा समूहाचाच नाही तर देशाचाही विकास झाला. मात्र, आता टाटा यांच्या एका कंपनीचे २ तुकडे होणार आहेत. टाटा मोटर्स त्यांचे प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगवेगळे करणार आहेत. कंपनीच्या बोर्डाने डिमर्जरनंतर, आपला व्यवसाय २ कंपन्यांमध्ये विभाजित करण्यास आणि स्टॉक एक्स्चेंजवर स्वतंत्र सूचीबद्ध करण्यास मान्यता दिली आहे. पण, बोर्डाने असा निर्णय का घेतला?

टाटा मोटर्स व्यवसायाचे २ भागात करणार विभाजन
टाटा मोटर्स अधिकृतपणे आपला व्यवसाय २ भागात विभाजित करणार आहे. एक व्यावसायिक वाहनांवर आणि दुसरा जग्वार लँड रोव्हर (JLR) आणि इलेक्ट्रिक कारसह प्रवासी वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सने पुढील महिन्यात ६ मे २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता (IST) आपल्या भागधारकांसोबत एक महत्त्वाची बैठक नियोजित केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे ही बैठक व्हर्च्युअली आयोजित केली जाईल.

कोण करू शकणार मतदान?
या मतदान प्रक्रियेत २८ मार्च २०२५ पर्यंत ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत आहेत, तेच भागधारक ६ मे रोजीच्या बैठकीत भाग घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात. तुम्ही या तारखेनंतर शेअर्स खरेदी केल्यास, तुम्ही डिमर्जर प्रस्तावावर मत देण्यास पात्र असणार नाही. रिमोट ई-व्होटिंग २ मे (सकाळी ९:००) ते ५ मे (संध्याकाळी ५:०० वाजता) होईल. एक्सचेंज फाइलिंगनुसार, शेअरहोल्डर्स बैठकीदरम्यान त्यांचे मत देऊ शकतात. योजना मंजूर झाल्यास, टाटा मोटर्सच्या भागधारकांना टाटा मोटर्सच्या प्रत्येक शेअरमागे २ रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले व्यावसायिक वाहनांचा एक हिस्सा मिळेल. 

वाचा - शेअर बाजारात हाहाकार! 'या' ५ मोठ्या कारणांमुळे बाजार कोसळला, घसरण वाढणार की थांबणार?

कसे असेल टाटा मोटार्सचे विभाजन
टाटा मोटर्स त्यांच्या दोन स्वतंत्रपणे लिस्टेड कंपन्यांचे डिमर्जिंग करत आहे, ज्यात टाटा मोटर्स कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड (TMLCV) या कंपनीच्या सर्व व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल. दुसरे, टाटा मोटर्स लिमिटेड (TML) प्रवासी वाहन बनेल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, जेएलआर आणि संबंधित गुंतवणुकीचा समावेश आहे.
 

Web Title: Ratan Tata's Tata Motors Demerger Why such a big decision?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.