RBI News: आजकाल सोने गहाण ठेवून कर्ज घेणे खूप सामान्य गोष्ट झाली आहे. याला ‘गोल्ड लोन’ किंवा ‘लोन ऑन गोल्ड’ म्हणतात. अशाप्रकारे सोन्यावर कर्ज देणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आहेत. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने यातील एका मोठ्या कंपनीला गोल्ड लोन मंजूर करण्यावर बंदी घातली आहे.
आरबीआयने IIFL फायनान्स लिमिटेडला गोल्ड लोन देण्यास बंदी घातली आहे. ही बंदी कंपनीवर सोमवारी तात्काळ लागू करण्यात आली. सोन्यावरील कर्ज देण्याच्या प्रकरणात कंपनीबाबत आरबीआयच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या, त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आरबीआयने फक्त IIFL फायनान्सच्या गोल्ड लोनवर बंदी घातली असून, उर्वरित सेवा सुरू राहणार आहेत.
या कारणामुळे बंदी घातलीआरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले की, IIFL फायनान्सच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीनुसार तिच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओत काही गोष्टी आढळल्या, यामध्ये सोन्याच्या लिलावाच्या वेळी कर्जाची मान्यता, त्यासाठी लागणारा वेळ आणि चूक झाल्यास सोन्याची शुद्धता आणि वजन तपासणे आणि त्याची पडताळणी आदींबाबत अनियमितता आढळून आली. यानंतर सेंट्रल बँकेने कंपनीची ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला. आता आरबीआय कंपनीच्या जवळपास सर्व कागदपत्रांचे ऑडिट करेल, त्यानंतरच या बंदीचा आढावा घेतला जाईल.
IIFL शेअर प्राइज IIFL फायनान्सचे शेअर आज (4 मार्च) 3.35 टक्क्यांनी घसरुन 598.10 वर बंद झाले. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 704.20 आणि निच्चांक 408.40 आहे. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 22,816.50 कोटी रुपये आहे. एका वर्षात या स्टॉकने 34 टक्के परतावा दिला आहे.
(टीप - शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)