Lokmat Money >शेअर बाजार > RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:14 IST2025-02-07T14:13:13+5:302025-02-07T14:14:07+5:30

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात.

RBI Repo Rate Cut in 5 Years Share Market Did Not Respond Positively Know Reasons | RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Cut : RBI नं ५ वर्षांत पहिल्यांदा केली रेपो दरात कपात, पण शेअर बाजारानं दिला नाही भाव, कारणं काय?

RBI Repo Rate Share Market: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पाच वर्षांनंतर रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. कर्ज स्वस्त करण्यासाठी असं केलं जातं जेणेकरून बाजारात तरलता वाढेल. सहसा शेअर बाजार अशा घोषणेला सकारात्मक प्रतिसाद देतो आणि बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी येते. 

पण आज या क्षेत्रांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. या घोषणेनंतर बँकिंग शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी बँक ०.५ टक्क्यांनी घसरला, तर एसबीआय, पीएनबी आणि अॅक्सिस बँकेसारख्या बड्या बँकांचे शेअर्सही घसरले. अशा तऱ्हेनं असे कोणते घटक आहेत, ज्यामुळे व्याजदर कपातीनंतरही शेअर बाजाराची प्रतिक्रिया थंड राहिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणती आहेत कारणं?

अनिश्चिततेचे वातावरण : जागतिक मंदीची भीती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा बाजाराच्या दिशेवर परिणाम झाला आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर ही कपात अपुरी ठरू शकते, असं गुंतवणूकदारांचं मत आहे.

बाजारातील अपूर्ण अपेक्षा : गुंतवणूकदारांना आणखी कपातीची अपेक्षा होती. तज्ञांचे म्हणणे आहे की बाजाराला किमान ०.५०% कपातीची अपेक्षा होती, ज्याचा खऱ्या अर्थानं कर्जावर परिणाम झाला असता.

गुंतवणूकदारांची चिंता : सध्याच्या महागाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही कपात पुरेशी नसून बाजाराला अधिक ठोस उपाययोजनांची गरज असल्याचं बाजार तज्ज्ञांचं मत आहे.

शेअर बाजारात पुढे काय?

आता पुढील पावलांवर बाजाराचे लक्ष असणार आहे. आर्थिक सुधारणांसाठी आरबीआयला अधिक आक्रमक पावले उचलावी लागतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. या कपातीमुळे अल्पकालीन दिलासा मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याचा दीर्घकालीन परिणाम अद्याप अनिश्चित असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जोपर्यंत बाजार स्थिर होत नाही तोपर्यंत या क्षेत्रावर दबाव राहण्याची शक्यता आहे.

Web Title: RBI Repo Rate Cut in 5 Years Share Market Did Not Respond Positively Know Reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.