Kotak Mahindra Bank Share Price: कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) शेअरच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी कंपनीचा शेअर कामकाजादरम्यान ३.०२ टक्क्यांनी घसरून १५९६ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता. बँकेचे शेअर्स घसरण्यामागील कारण व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस मणियन यांचा राजीनामा असल्याचं म्हटलं जात आहे.
खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस मणियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीएनबीसी-१८ च्या रिपोर्टनुसार, बँकेनं व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदासाठी २ लोकांची नावं निश्चित केली आहेत.
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
बँकेला सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकेला नव्यानं डिजिटल पद्धतीनं ग्राहक जोडणं आणि नव्यानं क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध घातले आहेत.
५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर
कोटक महिंद्रा बँकेचा शेअर गुरुवारी १५९६ रुपयांवर (रात्री १० वाजेच्या सुमारास) उघडल्यानंतर ४.३८ टक्क्यांनी घसरून १५५२.५५ रुपयांच्या इन्ट्रा डे लो लेव्हल पर्यंत घसरला. बँकेची ही ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरच्या किंमतीत गेल्या वर्षभरात १९.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोटक महिंद्रा बँकेचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर २०६३ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)