Lokmat Money >शेअर बाजार > 'अमेरिकेत मंदी तर भारतात मोदी', दिग्गज गुंतवणूकदाराचे मोठे विधान

'अमेरिकेत मंदी तर भारतात मोदी', दिग्गज गुंतवणूकदाराचे मोठे विधान

बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटामुळे अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2023 03:17 PM2023-04-25T15:17:29+5:302023-04-25T15:17:45+5:30

बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटामुळे अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे.

'recession in America and Modi in India', a big statement from a veteran investor Vijay Kedia | 'अमेरिकेत मंदी तर भारतात मोदी', दिग्गज गुंतवणूकदाराचे मोठे विधान

'अमेरिकेत मंदी तर भारतात मोदी', दिग्गज गुंतवणूकदाराचे मोठे विधान


बँकिंग क्षेत्रात आलेल्या संकटामुळे अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. जर अमेरिकेला मंदीचा फटका बसला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगात दिसून येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, शेअर बाजारातील अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांचे मत वेगळे आहे. सरकारचा पायाभूत सुविधा, जीएसटी आणि पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजनांवर भर आहे. देशांतर्गत इक्विटी मार्केटबद्दलचा आशावादी दृष्टीकोन कायम ठेवल्याने सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे, असे त्यांचे मत आहे.

भारतात मंदी येणार? 
विजय केडिया यांचे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत हे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेसह विकसित बाजारपेठांमध्ये मंदीची चर्चा आहे. केडिया म्हणाले- 'अमेरिकेत मंदी आली, तर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पीएम मोदींच्या नेतृत्वात आमच्याकडे व्यावहारिक धोरणे आहेत.' यामुळेच जागतिक बाजारातील अनिश्चितता असूनही, बेंचमार्क इक्विटी निर्देशांक त्याच्या सर्वकालीन उच्च पातळीपासून फक्त पाच ते सहा टक्के दूर आहे.

शेअर बाजाराची परिस्थिती
टॉप 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स आज सकाळी 60,171 वर व्यवहार करत होता. 1 डिसेंबर 2022 रोजी 63,583 चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. विजय केडिया यांना वाटते की, बाजार नवीन उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. मंदी आली तर ती सौम्य असेल, असेही त्यांचे म्हणने आहे. ट्रेंडलाइनकडे उपलब्ध डेटा दर्शवितो की विजय केडिया यांच्याकडे पटेल इंजिनीअरिंग, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स, अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, अतुल ऑटो, नुलँड लॅबोरेटरीज आणि वैभव ग्लोबल यांसारख्या कंपन्यांमध्ये प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.

विजय केडिया असेही मानतात की, यूएस फेडने आणखी दर वाढवल्यास त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार नाही. बँकिंग क्षेत्राबाबत आपले विचार मांडताना विजय केडिया म्हणाले की, पुढील 2-3 वर्षे कर्जदारांसाठी चांगली असतील. गुंतवणूकदारांनी बँकिंग क्षेत्राबाबत विशिष्ट दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. आयटी क्षेत्रात 3-6 महिन्यांपासून कोणतीही संधी दिसत नाही, असेही ते म्हणाले. 

Web Title: 'recession in America and Modi in India', a big statement from a veteran investor Vijay Kedia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.