Closing Bell : शेअर बाजारातील सोमवारी कामकाजादरम्यान मोठे चढ-उतार दिसून आले. बाजारानं खालच्या पातळीवरून चांगली रिकव्हरी दर्शविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 112 अंकांनी वधारून 72776 वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49 अंकांनी वधारून 22104 च्या पातळीवर बंद झाला.
निफ्टीने आज 21821 च्या पातळीवरून झपाट्यानं रिकव्हरी दर्शवली आणि 21850 च्या पातळीपासून अल्पावधीतच बुलिश स्ट्रक्चर बनवून पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा 22000 ची पातळी गाठली.
टॉप गेनर्स,टॉप लूझर्स
आजच्या बाजारात निफ्टी ५० मध्ये सिप्ला, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब्स, अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. सिप्लाचा शेअर ५.६१ टक्क्यांनी वधारला. आजच्या बाजारात टाटा मोटर्सच्या निकालानंतर हा शेअर कमकुवत होऊन ८ टक्क्यांनी घसरला. यामुळे वाहन निर्देशांकात जोरदार विक्री झाली. टाटा मोटर्स, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक घसरले.
आजच्या बाजारात फार्मा, आयटी आणि बँकिंग शेअर्सनी नीचांकी स्तरावरून बाजाराला आधार देण्यात मोठी भूमिका बजावली.