Lokmat Money >शेअर बाजार > रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी!

रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी!

गेल्या 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कॅनरा बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा वाटा अथवा हिस्सेदारी वाढून 2.07 पर्सेंटवर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:49 AM2023-01-10T00:49:16+5:302023-01-10T00:52:00+5:30

गेल्या 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कॅनरा बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा वाटा अथवा हिस्सेदारी वाढून 2.07 पर्सेंटवर पोहोचली आहे.

rekha jhunjhunwala increased stake in government canara bank, 55 percent rise in 4 months | रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी!

रेखा झुनझुनवाला यांनी पुन्हा खरेदी केले या सरकारी बँकेचे शेअर, 4 महिन्यात आली 55 टक्क्यांची तेजी!

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे (Canara Bank) आणखी शेअर्स खरेदी केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत 0.59% हिस्सेदारी वाढवली आहे. कॅनरा बँकेचा शेअर सोमवारी 2% वाढून 326.55 रुपयांवर बंद झाला. या बँकेच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 341.60 रुपये एढा आहे. तर निचांकी 171.70 रुपये एवढा आहे.

आता रेखा झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेत 2.07% वाटा -
गेल्या 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कॅनरा बँकेत रेखा झुनझुनवाला यांचा वाटा अथवा हिस्सेदारी वाढून 2.07 पर्सेंटवर पोहोचली आहे. सप्टेंबर 2022 तिमाहीत या बँकेत त्यांची हिस्सेदारी 1.48 टक्के होती. जून 2022 तिमाहीत 1.96 टक्के होती. केनरा बँकेत  पब्लिक शेअरहोल्डिंग 37.07 ट्क्के आहे. जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत कॅनरा बँकेचा रेव्हेन्यू 20106.92 कोटी रुपये होता. महत्वाचे म्हणजे, सप्टेंबरच्या तिमाहीत या बँकेला 2525.47 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये 4 महिन्यात 55 टक्क्यांची तेजी - 
कॅनरा बँकेचे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून तेजीत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेच्या शेअर्सनी 4 महिन्यांपेक्षा कमी काळात 55% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर कॅनरा बँकेचा शेअर 210.15 रुपयांवर होते. 9 जानेवारी 2023 रोजी बँकेचा शेअर BSE वर रु.326.50 वर बंद झाला. तसेच, कॅनरा बँकेच्या शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत 50.5% परतावा दिला आहे. तर एका वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 49% वाढ झाली आहे. तसेच, कॅनरा बँकेच्या शेअरने या महिन्याच्या सुरुवातीला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) जवळपास 5 वर्षांतील उच्चांक 341.70 ला टच केले आहे.

Web Title: rekha jhunjhunwala increased stake in government canara bank, 55 percent rise in 4 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.