अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलची विक्री आता अंतिम टप्प्यात आहे. यातच, या आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी अर्थात सोमवारी रिलायन्स कॅपिटलच्या शेअरने 52 आठवड्यांतील जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. ट्रेडिंगदरम्यान या शेअरमध्ये 5 टक्क्यांची तेदी आली असून आता तो 13.08 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या शेअरची क्लोजिंग प्राईस 2 टक्क्यांच्या घसरणीसह 12.21 रुपयांवर होती. 29 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 7.60 रुपये एवढी होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांतील निचांक आहे.
केव्हा किती परतावा -रिलायन्स कॅपिटलच्या शेअरची किंमत वार्षिक आधारावर 40 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच, सहामाहीचा विचार करता 35 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. एका महिन्याच्या कालावधीत हा शेअर 20 टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, दीर्घ काळात या शेअरने गुंतवणूकदारांन कंगाल केले आहे. साधारणपणे 15 वर्षांपूर्वी 2700 रुपयांपर्यंत जाणाऱ्या रिलायन्स कॅपिटलच्या शेअरमध्ये 99 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे.
या कंपनीनं केली खरेदी -रिझर्व्ह बँकेने नुकतीच रिलायन्स कॅपिटलसाठी रिझोल्यूशन प्लॅन मंजूर केला आहे. रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयामुळे हिंदुजा समुहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडसाठी (IIHL) रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनी प्रशासकाला 17 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्राद्वारे रिझर्व्ह बँकेकडून ना हरकत प्राप्त झाली आहे.
रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण करण्यासाठी हिंदुजा समूहाची कंपनी आयआयएचएल 9,650 कोटी रुपयांसह सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी ठरली. रिझव्र्ह बँकेने पेमेंट डिफॉल्ट आणि प्रशासनासंदर्भातील काही गंभीर मुद्दे पाहता २९ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड विसर्जित केले होते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)