अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या (Reliance Communications Ltd) शेअर्समध्ये सोमवारी 25 नोव्हेंबरला ट्रेडिंग झाल्याचे दिसून आले. कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी 4.66% ची घसरण नोंदवण्यात आली आणि हा शेअर 1.84 रुपयांवर आला. या शेअर्सचे ट्रेडिंग गेल्या अनेक सत्रांपासून बंद होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 20% आणि या वर्षात आतापर्यंत 11% ची घसरण झाली आहे.
₹1 लाखाचे झाले 227 रुपये -
11 जानेवारी 2008 रोजी या शेअरची किंमत 792 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरमध्ये 99% ची घसरण झाली आहे. अर्थात, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये तेव्हा 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आतापर्यंत टिकवून ठेवली असती, तर आता तिचे 227 रुपये झाले असते.
कंपनीचे मार्केट कॅप 508.86 कोटी रुपये -
कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 2.59 रुपये तर नीचांकी किंमत 1.47 रुपये एवढी आहे. याचप्रमाणे कंपनीचे मार्केट कॅप 508.86 कोटी रुपये एवढे आहे. अनिल अंबानींच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्स देखील दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूह अनेक कंपन्यांचे एक औद्योगिक घराणे अथवा समूह आहे. अनिल अंबानी त्याचे मालक आहेत.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)