Lokmat Money >शेअर बाजार > 'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या, रिटर्न देण्यातही आहेत 'एक नंबर' 

'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या, रिटर्न देण्यातही आहेत 'एक नंबर' 

Stock Market News: भारतीय कंपन्यांसाठी २०२३-२४ हे आर्थिक वर्ष खूप उत्तम राहिलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निफ्टी ५० कंपन्यांचा एकूण नफा ८.१४ लाख कोटी रुपये होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:53 AM2024-06-29T11:53:38+5:302024-06-29T11:55:22+5:30

Stock Market News: भारतीय कंपन्यांसाठी २०२३-२४ हे आर्थिक वर्ष खूप उत्तम राहिलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निफ्टी ५० कंपन्यांचा एकूण नफा ८.१४ लाख कोटी रुपये होता.

reliance hdfc sbi ongc are the most profitable companies in the country also giving huge returns share market investment | 'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या, रिटर्न देण्यातही आहेत 'एक नंबर' 

'या' आहेत देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या, रिटर्न देण्यातही आहेत 'एक नंबर' 

Stock Market News: भारतीय कंपन्यांसाठी २०२३-२४ हे आर्थिक वर्ष खूप उत्तम राहिलं आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निफ्टी ५० कंपन्यांचा एकूण नफा ८.१४ लाख कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी तो ६.३९ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर नफ्यात २७ टक्के वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत टॉप ४ सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या आणि त्यांनी कशी कामगिरी केली?

रिलायन्स इंडस्ट्रिज (Reliance Industries) - मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ७८,६३३ कोटी रुपयांसह सर्वाधिक नफ्यात असलेली कंपनी ठरली आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात २३ टक्क्यांची वाढ झाली.

स्टेट बँक ऑफ इंडिया  (Stata Bank Of India) - या यादीत एसबीआय दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँकेचा एकूण नफा ६८,१३८ कोटी रुपये झाला आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा २० टक्के अधिक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या १२ महिन्यांत ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँक (HDFC Bank Share Price) - या खासगी बँकेला एकूण ६५,४६६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्यातुलनेत कंपनीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. गेल्या १२ महिन्यांत शेअर्सच्या किमतीत केवळ २ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.

ओएनजीसी(HDFC Bank Share Price) - सरकारी कंपनीच्या नफ्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या पीएसयू कंपनीचा नफा ५४,७०५ कोटी रुपये झाला आहे. शेअर बाजारातही कंपनीची कामगिरी शानदार राहिली आहे. गेल्या १२ महिन्यांत या पीएसयू शेअरची किंमत ७० टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचं मार्केट कॅप १४.२३ लाख कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: reliance hdfc sbi ongc are the most profitable companies in the country also giving huge returns share market investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.