Join us

रिलायन्सच्या शेअरधारकांना मिळणार दिवाळी गिफ्ट! शेअर्स होणार दुप्पट, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 3:26 PM

Bonus Share: कंपनीने सप्टेंबरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची रेकॉर्ड डेट सोमवारच्या बैठकीत जाहीर होऊ शकते.

Bonus Share : तुमच्याकडे जर रिलायन्सचे शेअर्स असतील तर तुम्हाला उद्या लॉटरी लागू शकते. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअरधारकांना सोमवारी गुड न्यूज मिळू शकते. कंपनीच्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट सोमवारी जाहीर केली जाऊ शकते. कंपनीने सप्टेंबरमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बोनस शेअर्स वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी प्रत्येक शेअरसाठी एक शेअर देणार असल्याने तुमचे शेअर्स दुप्पट होऊ शकतात.

रिलायन्सकडून गुंतवणूकदारांना दिवाळी भेटरिलायन्स इंडस्ट्रीजचा हा बोनस शेअर बाजारातील आपल्या प्रकारातील सर्वात मोठा असणार आहे. सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी ही भेट मानली जात आहे. रिलायन्सने याला दिवाळी गिफ्ट असे नाव दिले आहे. मात्र, त्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या १४ ऑक्टोबरला बोनस शेअर जाहीर केला जाऊ शकतो. सोमवारी, कंपनी आपल्या तिमाही आणि सहामाही निकालांचा आढावा घेल्यानंतर, त्यांना मंजूरी देखील देऊ शकते.

संचालक मंडळाच्या बैठकीत त्रैमासिक निकालांचा आढावा घेणार संचालक मंडळाची बैठक १४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले आहे. या कालावधीत, ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांचा आढावा घेतला जाईल. सेबीच्या नियमांनुसार, सिक्युरिटीजमधील व्यवहारांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची ट्रेडिंग विंडो १ ऑक्टोबर २०२४ रोजी बंद करण्यात आली होती. तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर ही विंडो ४८ तासांपर्यंत बंद राहील.

आयपीओ आल्यानंतर सहाव्यांदा बोनस जारी रिलायन्स इंडस्ट्रीजने आयपीओ आणल्यानंतर सहाव्यांदा बोनस जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, एका दशकातील हा दुसरा बोनस इश्यू आहे. आमच्या गुंतवणूकदारांना आम्ही सातत्याने लाभ देणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. २०१७ पासून आमचे सुवर्ण दशक सुरू झाले आहे. यासाठी भागधारकांना बक्षीसही मिळायला हवे. २०१७ मध्ये देखील कंपनीने आपल्या भागधारकांचे शेअर्स दुप्पट केले होते.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारशेअर बाजार