Join us

₹३७८६ पर्यंत जाऊ शकतो Reliance Industriesचा शेअर; देशांतर्गत ब्रोकरेज बुलिश; का दिलं हाइएस्ट टार्गेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:21 PM

RIL Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी मुकेश अंबानींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान,आता ब्रोकरेज रिलायन्स या स्टॉकवर बुलिश दिसून येत आहेत. त्यांनी कंपनीच्या शेअरचं टार्गेट प्राईजही वाढवलंय.

RIL Target Price: रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Share) म्हणजेच आरआयएलचे शेअर्स आज म्हणजेच शुक्रवारी एक टक्क्यांपेक्षा जास्त तेजीसह उघडले. मात्र थोड्यावेळानं आरआयएलचा शेअर बीएसईवर ०.९६ टक्क्यांनी घसरून ३०१२ रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) निफ्टी ५० च्या निर्देशांकाबाबत बहुतांश विश्लेषकांनी तेजीचा दृष्टिकोन कायम ठेवला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल अल्टरनेटिव्ह्सनं या शेअरला ३,७८६ रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय. ही किंमत सध्याच्या दरापेक्षा सुमारे २६ टक्क्यांनी अधिक आहे.

सीएनबीसी न्यूज १८ नुसार मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहानं आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन एनर्जी बिझनेस, मजबूत डिजिटल आणि रिटेल आऊटलूक आणि O2C क्षेत्रातील मोठ्या विस्तारामुळे पाच ते सात वर्षांत उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता अधोरेखित केली. त्याचबरोबर प्रस्तावित १:१ बोनस इश्यूवरही बोर्ड ५ सप्टेंबर रोजी निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं.

का बुलिश आहे ब्रोकरेज?

४७ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पुढील पाच ते सात वर्षांमध्ये न्यू एनर्जी बिझनेस सध्याच्या O2C नफ्याच्या बरोबरीचा होण्याची शक्यता आहे, याबाबत कन्सोलिडेटेड प्रॉफिटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होऊ शकते आणि विशेषत: ग्रीन एनर्जीच्या उपक्रमांमुळेमूल्यमध्ये उल्लेखनीय वाढ होऊ शकते, असं अंदाज नुवामानं व्यक्त केलाय. O2C सध्या सर्वात मोठा नफ्याचा आधार आहे, जो EBIDTA च्या दोन पंचमांश आणि अॅट्रिब्युटेबल नफ्याच्या अर्ध्याहून अधिक योगदान देतो.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी