Lokmat Money >शेअर बाजार > Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?

Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?

Reliance Industries Share : भारतीय शेअर बाजारात लिस्टेड सर्वात मोठी मार्केट कॅप असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) नुकतेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे तिमाही निकाल जाहीर केले. या निकालानंतरही रिलायन्सच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:56 PM2024-10-16T15:56:15+5:302024-10-16T15:58:39+5:30

Reliance Industries Share : भारतीय शेअर बाजारात लिस्टेड सर्वात मोठी मार्केट कॅप असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) नुकतेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे तिमाही निकाल जाहीर केले. या निकालानंतरही रिलायन्सच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे.

Reliance Industries shares falling why is RIL delaying bonus shares know reason behind this 1 1 bonus stock rel agm | Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?

Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?

Reliance Industries Share : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून वरील पातळीवरून विक्रीचा दबाव आहे. २४९००-२५००० झोन निफ्टीसाठी सपोर्ट झोन आहे. बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शनही पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात लिस्टेड सर्वात मोठी मार्केट कॅप असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) नुकतेच २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे तिमाही निकाल जाहीर केले. या निकालानंतरही रिलायन्सच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे.

बुधवारी सलग १३ दिवसांच्या घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर बुधवारी दुपारी दोन वाजता ०.५० टक्क्यांनी वधारून २,७००.५५ रुपयांवर व्यवहार करत होता. कामकाजाच्या अखेरिस रिलायन्सचा शेअर २,७०९ रुपयांवर बंद झाला.

का होतेय घसरण?

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सलग १३ दिवसांपासून घसरण होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सायकिलिक डाऊनग्रेडच्या सीरिजमधून जात आहे. अर्निग डाऊनग्रेडमुळे शेअरची किंमत खाली जात आहे. त्यांच्या जुन्या म्हणजे ओ२सी व्यवसायातून सकारात्मक गोष्टी समोर आलेल्या नाहीत.

संस्थात्मक गुंतवणूकदारांचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडे विशेष लक्ष आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज हा इतका मोठा स्टॉक आहे की त्यावर रिटेल किंवा एचएनआयचे नियंत्रण असू शकत नाही. त्यात खऱ्या अर्थानं संस्थात्मक सहभाग असणं आवश्यक आहे, जे सध्या कमी होताना दिसत आहे आणि कदाचित म्हणूनच त्याच्या शेअरची किंमत घसरत आहे. आगामी काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा ट्रिगरमुळे खरेदी येऊ शकते.

बोनस शेअर कधी मिळणार?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) ने यावर्षी ५ सप्टेंबर रोजी ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित केली होती. तेव्हा १:१ बोनस जारी करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या ऑईल टू टेक्सटाइल कन्सोर्टियमनं अद्याप या इश्यूची कोणतीही विक्रमी तारीख जाहीर केलेली नाही. आरआयएलने ५ सप्टेंबर रोजी एक्स्चेंज फाइलिंगमध्ये याची रेकॉर्ड डेट स्वतंत्रपणे सांगितली जाणार असल्याचं म्हटलं.

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना आरआयएल सोमवारी, १४ ऑक्टोबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत रकॉर्ड डेट जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आरआयएलनं तसं न केल्यानं गुंतवणूकदारांची निराशा झाली.

का होतोय उशीर?

आरआयएलच्या एक्स्चेंज फाइलिंगनुसार, अंशत: पेड-अप इक्विटी शेअर्स असलेल्या काही भागधारकांनी अद्याप कॉल मनी भरलेली नाही. कॉल मनी हे बँकांसारख्या वित्तीय संस्थांमधील अल्पमुदतीचे कर्ज आहे, जे अल्पमुदतीच्या रोख प्रवाहाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलं जातं. याला कॉल मनी असेही म्हणतात.

आरआयएलने यापूर्वी अर्धवट भरलेले इक्विटी समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना समभाग जप्त होऊ नये म्हणून २० सप्टेंबर २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी देयके देण्याच्या नोटिसा पाठविल्या होत्या. कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि काही भागधारकांनी तात्पुरती मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत आरआयएलने २७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

आरआयएलनं २० सप्टेंबर रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये अंशत: पेड-अप इक्विटी शेअर्सधारकांकडून प्राप्त विनंत्यांचा सन्मान करून, थकित कॉल मनी भरण्याची शेवटची तारीख सोमवार, ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि पेमेंटची तारीख आणखी वाढविली जाणार नाही, असं म्हटलं होतं.

Web Title: Reliance Industries shares falling why is RIL delaying bonus shares know reason behind this 1 1 bonus stock rel agm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.