Join us

Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 3:01 PM

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सने दमदार कामगिरी केली.

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. पाच दिवसात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली, तर तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. यामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज टॉपवर राहिली.

रिलायन्सची जबरदस्त कमाईपीटीआयच्या मते, देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यातील सुमारे 50,000 कोटी रुपयांची कमाई केली. या कालावधीत रिलायन्सचे बाजार भांडवल (रिलायन्स एमकॅप) 47,021.59 कोटी रुपयांनी वाढले आणि कंपनीचे मूल्य 17,35,194.85 कोटी रुपयांवर गेले. 

या कंपन्यांचीही कमाईरिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त ज्या दोन कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले, त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा समावेश आहे. या कालावधीत, HUL चे MCap रु. 12,241.37 कोटींनी वाढून रु. 6,05,043.25 कोटींवर पोहोचले, तर HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 11,049.74 कोटींनी वाढून रु. 12,68,143.20 कोटींवर पोहोचले.

TCS सह या कंपन्यांचे पैसे बुडालेICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्ये (ICICI Bank MCap) गेल्या आठवड्यात 30,235.29 कोटी रुपयांची घसरण नोंदवली गेली. सध्या कंपनीचे Mcap 6,97,095.53 पर्यंत खाली आले आहे. यानंतर टाटा समूहाची आयटी कंपनी TCS चे मार्केट कॅप 12,715.21 कोटी रुपयांनी कमी होऊन 13,99,696.92 कोटी रुपयांवर आले. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे मूल्यही 5,68,185.42 कोटी रुपयांवर घसरले आणि गुंतवणूकदारांना 10,486.42 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक