Lokmat Money >शेअर बाजार > 15 दिवसांपासून रॉकेट बनलाय हा ₹2 चा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?

15 दिवसांपासून रॉकेट बनलाय हा ₹2 चा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?

गेल्या एका आठवड्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19% पर्यंतचा परतावा दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:56 PM2023-04-18T14:56:29+5:302023-04-18T14:56:50+5:30

गेल्या एका आठवड्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19% पर्यंतचा परतावा दिला.

reliance naval and engineering ₹2 share has take rocket speed from 15 days, making investors happy; do you have | 15 दिवसांपासून रॉकेट बनलाय हा ₹2 चा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?

15 दिवसांपासून रॉकेट बनलाय हा ₹2 चा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?

शेअर बाजारात विक्रीची स्थिती असतानाच रिलायन्स नेवल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंगच्या शेअर्सने (Reliance Naval and Engineering) रॉकेट स्पीड घेतला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअरला अपर सर्किट लगले आहे. बीएसईवर हा शेअर 4.68% टक्क्यांच्या तेजीसह 2.46 रुपयांवर होता. 31 मार्च 2023 रोजी या शेअरने 1.61 रुपयांच्या पातळीला टच केले होते. ही 52 आठवड्यांतील निचांकी पातळी आहे. तसेच 8 सप्टेंबर 2022 रोजी या शअरने 4.06 रुपयांच्या पातळीला स्पर्ष केला होता. ही शेअरची 52 आठवड्यांतील उच्च पातळी आहे.

गेल्या एका आठवड्यात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 19% पर्यंतचा परतावा दिला. तसेच, दोन आठवड्यांत या शेअर 43% पर्यंतचा परतावा दला आहे. एका महिन्या दरम्यान हा शेअर 20% पर्यंत वधारला आहे. तीन महिन्यांदरम्यान या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30% पर्यंतचा परतावा दिला आहे. 

कुणी केली खरेदी - 
स्वान एनर्जी आणि हेजल मर्केंटाइल यानी संयुक्तपणे दिवाळखोरीच्या प्रक्रियेत अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स नेव्हल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंगच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोली लावली होती. बोली प्रमाणे, स्वान-हेजल युतीला पहिल्या हप्त्याअंतर्गत 200 कोटी रुपये द्ययाचे आहेत. महत्वाचे म्हणजे, ही कंपनी जहाज बांधणी, जहाज आणि रिग्सची दुरुस्ती आदी  काम करते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: reliance naval and engineering ₹2 share has take rocket speed from 15 days, making investors happy; do you have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.