शेअर बाजारात गेल्या शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. मात्र, काही छोट्या शेअर्सना जबरदस्त मागणी होती. दरम्यान अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली अथवा खरेदी करण्यात आले. आठवड्याच्या या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, रिलायन्स पॉवरचा शेअर 1 टक्क्यांहून अधिक वाढून 16.44 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
खरे तर, या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 24.95 रुपये एवढा आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी या शेअरने ही पातळी गाठली होती. रिलायन्सचा हा शेअर मे 2008 मध्ये 275 रुपयांवर पोहोचला होता. अशा प्रकारे आतापर्यंत हा शेअर 98 टक्क्यांपेक्षाही अधिक घसरला आहे.
रिलायन्स पॉवरची सब्सिडियरी कंपनी-विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरचे कर्ज मिळवण्यासाठी 4 अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपन्यांनी (ARC) उत्सुकतादर्शवली आहे. या 4 कंपन्यांमध्ये, वर्दे पार्टनर्स समर्थित आदित्य बिरला ARC, रिलायन्स ARC, रेअर ARC आणि अॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी इंडियाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या कर्जासाठी सीएफएम ARC ने आधीच ₹1220 कोटी रुपयांची संपूर्ण रोख ऑफर दिली आहे. तसेच, वर्दे पार्टनर्सने प्रमोटरच्या ₹1260 कोटी रुपयांच्या एकरकमी निपटाऱ्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र यात लेंडर्सनी उत्सुकतादाखवली नाही.
शेअरहोल्डर्सचे ई-व्होटिंग -
रिलायन्स पॉवरच्या शेअरहोल्डर्ससाठी ई-मतदान उद्यापासून अर्थात 24 जुलैपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात कंपनीने आपल्या सर्व शेअरहोल्डर्सना मेल आणि मेसेज पाठवले आहेत. ही मतदान प्रक्रिया 27 जुलैपर्यंत चालेल. या कालावधीत, पब्लिक शेअरहोल्डर्सना कंपनीशी संबंधित समस्यांवर मत देण्याचा अधिकार असेल.