अनिल अंबानी यांची कर्जात बुडालेली कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर सध्या चर्चेत आहेत. कंपनीचा शेअर शुक्रवारी 3 टक्क्यांपर्यंत वधारून 23.90 रुपयांवर पोहोचा होता. गेल्या पाच व्यवहाराच्या दिवसांत हा शेअर 13.81 टक्क्यांनी वधारला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 50.79 वधारला आहे. या वर्षात YTD मध्ये हा शेअर 62.59 टक्क्यांनी वधारला आहे.
92 टक्क्यांनी घसरला आहे शेअर -
महत्वाचे म्हणजे, रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये या वर्षात तेजी दिसून आली आहे. मात्र दीर्घ काळात या शेअरने गुंतवणूकदारांना अक्षरशः बर्बाद केले आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत 255 रुपये होती आणि आता हा शेअर थेट 23.90 रुपयांवर आला आहे. अर्थात या काळात या शेअरमध्ये 91 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यातील परिणाम -
अधिक महसुलामुळे सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ तोटा कमी होऊन ₹237.76 कोटी झाला होता. फायलिंगनुसार, वर्षभरापूर्वीच्या कालावधीत हिचा एकत्रित निव्वळ तोटा ₹340.26 कोटी रुपये एवढा होता. गेल्या वर्षीच्या ₹1,945.14 कोटींवरून वाढून ₹2,130.83 कोटी झाले. या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून ₹2,130.83 कोटी झाले आहे, जे गेल्या वर्षी ₹1,945.14 कोटी रुपये एवढे होते. रिलायन्स पॉवर ही रिलायन्स समूहाचा एक भाग असून देशातील खासगी क्षेत्रातील एक मुख्य वीज उत्पादन आणि कोळसा संसाधान कंपनी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)