रेमिडियम लाईफकेअर लिमिटेडने (Remedium Lifecare Ltd) आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या केवळ 7 महिन्यांतच कंपनीच्या शेअरने तब्बल 2800 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 136.15 रुपये आहे. हा शेअर या पातळीवर 23 सप्टेंबर 2022 रोजी पोहोचला होता. तर, शुक्रवारी या शेअरची किंमत 3949 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती.
यानंतर आता कंपनीच्या बोर्ड मेंबर्सनी बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. 23 जानेवारीला झालेल्या बैठकीत कंपनीने 9:5 या रेशोत बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. यासाठी 29 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
काय म्हणाली कंपनी?
यासंदर्भात BSE वर माहिती देण्यात आली आहे. 'सेबीचे नियमन 42 (सूचीबद्धता दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता), नियमन 2015, दुरुस्त केल्याप्रमाणे, आम्ही आपल्याला माहिती देत आहोत की, रेमिडियम लाईफकेअर लिमिटेडने (कंपनी) 29 जुलै, 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीने 9:5 या रेशोमध्ये बोनस इक्विटी शेअर्सला अप्रूव्हल दिले आहे. अर्थात कंपनीकडून 5 शेअरवर 9 बोनस शेअर दिले जातील.'
1 डिसेंबरचा विचार करता 2800 टक्के परतावा -
एक डिसेंबर 2022 चा विचार करता रेमिडियम लाईफकेअर लिमिटेडचा शेअर केवळ सात महिन्यांतच 2800 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. गेल्या 1 डिसेंबर 2022 रोजी सेंसेक्सने ऑल टाइम हाय टच केले होते. यानंतर आता 23 जून 2023 रोजी मार्केटने आपला मागील ऑल टाइम हायला मागे टाकले आहे.