Lokmat Money >शेअर बाजार > Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Impact of exit polls on market Modi Stocks: एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला प्रचंड यश मिळाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो. अशा परिस्थितीत आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये बंपर उसळी पाहायला मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 08:22 AM2024-06-03T08:22:22+5:302024-06-03T08:22:49+5:30

Impact of exit polls on market Modi Stocks: एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला प्रचंड यश मिळाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो. अशा परिस्थितीत आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये बंपर उसळी पाहायला मिळू शकते.

Result of Exit Polls lok sabha 2024 bjp 3rd term Today Modi stocks may see a boom what experts say find out | Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Impact of exit polls on market Modi Stocks: एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला प्रचंड यश मिळाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून येऊ शकतो. मोदी सरकारच्या हॅटट्रिकच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये बंपर उसळी पाहायला मिळू शकते.
 

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलप्रमाणेच आले तर बाजारात तेजी येऊ शकते. ब्रोकरेज कंपनीनं 'मोदी स्टॉक्स' असं नाव दिलेल्या ५४ कंपन्यांच्या समभागांमध्ये आज तेजी दिसून येऊ शकते.
 

यात दिसू शकते तेजी
 

एल अँड टी, एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, ओएनजीसी, आयजीएल, महानगर गॅस, अशोक लेलँड, अल्ट्राटेक, एल अँड टी, बजाज फायनान्स, मॅक्स फायनान्शियल्स, झोमॅटो, डीमार्ट, भारती एअरटेल, इंडस टॉवर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे.
 

'या' प्रमुख पीएसयू शेअर्सवर असेल नजर
 

एचएएल, हिंदुस्थान कॉपर, नाल्को, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सेल, भेल, आरईसी, एचपीसीएल, बीपीसीएल, गेल, पीएफसी, आयआरसीटीसी, पीएनबी, एसबीआय, कॅनरा बँक.
 

का येऊ शकते तेजी?
 

"पीएसयू शेअर्स जून किंवा जुलैपर्यंत वाढू शकतात. कारण, गेल्या दोन निवडणुकांमध्येही असाच पॅटर्न पाहायला मिळाला होता. तेव्हा निवडणूक निकालानंतर पीएसयू शेअर्समध्ये तेजी आली होती. 'मोदी स्टॉक्स'नं निफ्टीला मागे टाकलं असून सध्याचं सरकार पुन्हा भक्कम बहुमताने सत्तेवर आल्यास हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे," असं आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी सीएलएसएनं म्हटलंय.
 

आज बाजाराची स्थिती कशी असेल?
 

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, आता सर्वांच्या नजरा मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत. याआधी सोमवारी 'एक्झिट पोल'वर सर्व गुंतवणूकदारांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात जोरदार तेजी येऊ शकते आणि निफ्टी २३००० ची पातळी ओलांडू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. पीएसयू शेअर्समध्ये तेजीचा टप्पा दिसू शकतो. मात्र, निकाल उलटला, तर बाजारात काहीशी 'नर्व्हसनेस' निर्माण होऊ शकतो, असंही तज्ज्ञांनी म्हटलंय.
 

अनिश्चितता दूर होईल
 

अंतिम निकालही एक्झिट पोलप्रमाणेच आले तर बाजारातून अनिश्चितता दूर होईल, असं एमके रिसर्चच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. भारतीय बाजारापासून दूर गेलेले परदेशी गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित होऊ शकतात. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाबाबत अनिश्चितता आणि चिनी बाजाराच्या चांगल्या कामगिरीमुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय शेअर्समधून २५,५८६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) मार्चमध्ये इक्विटीमध्ये ३५,०९८ कोटी रुपये आणि फेब्रुवारीमध्ये १,५३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. 
 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Result of Exit Polls lok sabha 2024 bjp 3rd term Today Modi stocks may see a boom what experts say find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.