Lokmat Money >शेअर बाजार > ₹१० हजारांच्या गुंतवणूकीवर ₹७ लाखापर्यंतचे रिटर्न; २०२४ मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समुळे झाला 'धनलाभ'

₹१० हजारांच्या गुंतवणूकीवर ₹७ लाखापर्यंतचे रिटर्न; २०२४ मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समुळे झाला 'धनलाभ'

Multibagger Stock 2024:  व्यवसायाच्या दृष्टीनं २०२४ या वर्षाचे ६ महिने उलटून गेले आहेत. या काळात अनेक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत तुफान वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 01:39 PM2024-06-29T13:39:46+5:302024-06-29T13:47:29+5:30

Multibagger Stock 2024:  व्यवसायाच्या दृष्टीनं २०२४ या वर्षाचे ६ महिने उलटून गेले आहेत. या काळात अनेक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत तुफान वाढ झाली आहे.

Returns up to rs 7 lakh on an investment of rs 10000 In 2024 the shares of these companies resulted in profits shri adhikari brothers royal india | ₹१० हजारांच्या गुंतवणूकीवर ₹७ लाखापर्यंतचे रिटर्न; २०२४ मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समुळे झाला 'धनलाभ'

₹१० हजारांच्या गुंतवणूकीवर ₹७ लाखापर्यंतचे रिटर्न; २०२४ मध्ये या कंपन्यांच्या शेअर्समुळे झाला 'धनलाभ'

Multibagger Stock 2024:  व्यवसायाच्या दृष्टीनं २०२४ या वर्षाचे ६ महिने उलटून गेले आहेत. या काळात अनेक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत तुफान वाढ झाली आहे. आकडेवारी पाहिली तर श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कच्या शेअरच्या किंमतीत यंदा ७५.०२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २८ जून रोजी कंपनीच्या शेअरची किंमत २४५.५५ रुपये होती.

२९ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचा शेअर ३.२३ रुपयांवर होता. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये १० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांचा परतावा आजच्या घडीला वाढून ७.५० लाख रुपये झाला असता. या काळात बीएसई सेन्सेक्समध्ये ९ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे २२ ते २५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर

या यादीत रॉयल इंडिया कॉर्पोरेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत हा शेअर ८१४ टक्क्यांनी वधारला आहे. या वाढीनंतरही २८ जून रोजी शेअरचा भाव ३६.३८ रुपयांच्या पातळीवर होता. तर २९ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ३.९८ रुपयांच्या पातळीवर होते. परताव्याच्या बाबतीत टिन्ना ट्रेड, मार्सन्स, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्दी लाइफ अॅग्रिटेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

या कंपन्यांनीही कमावले नशीब

एरायस लाईफस्पेसचे शेअर्स ६०२ टक्के आणि स्प्राइट अॅग्रोचे ५७५ टक्के, बोंडाडा इंजिनीअरिंगचे शेअर्स ५६८ टक्के, सायनिक एक्स्पर्टचे शेअर्स ५५३ टक्के, इंटिग्रे स्विचगिअरचे शेअर्स ५०९ टक्के आणि एरपेस इंडस्ट्रीजचे शेअर्स ५०६ टक्क्यांनी वधारले.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Returns up to rs 7 lakh on an investment of rs 10000 In 2024 the shares of these companies resulted in profits shri adhikari brothers royal india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.