Join us

Adani, इलॉन मस्क यांना एकाच दिवसात 20,47,76,96,95,000 रुपयांचा फटका, शेअर्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 10:56 AM

अदानी समूहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.

टेस्ला आणि अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा टेस्लाचे प्रमुख इलोन मस्क आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना फटका बसला आहे. अदानी आणि मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवशी 25.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. रुपयांमध्ये सांगायचं झालं तर ही रक्कम 20,47,76,96,95,000 रूपये आहे.

सोमवारी अदानी समूहाच्या अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी एन्टरप्राईजेस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले. त्याचा परिणाम त्यांच्या संपत्तीवर झाला. त्यांनी एका दिवसात तब्बल 9.67 कोटी रूपये गमावले. यामुळे त्यांच्या रँकिंगमध्येही घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये ते आता चौथ्या स्थानावर आले. 

या यादीत 223 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह इलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर कायम आहे. तर 139 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जेफ बेझोस दुसऱ्या, 130 अब्ज डॉलर्स संपत्तीसह बर्नार्ड अर्नाल्ट तिसऱ्या आणि 120 अब्ज डॉलर्स संपत्तीसह अदानी चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 81.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अदानी 10 व्या क्रमांकावर आहेत. 

दोघांच्या संपत्तीत मोठी घसरणशेअर्समध्ये झालेल्या घसरणीनंतर मस्क यांच्या संपत्तीतही 15.5 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये तब्बल 8.61 टक्क्यांची घसरण झाली. सोमवारी मस्क आणि अदानी यांना सर्वाधिक फटका बसला. दोघांच्याही संपत्तीत मिळून 25.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली. 

टॅग्स :गौतम अदानीएलन रीव्ह मस्कशेअर बाजार