Lokmat Money >शेअर बाजार > लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल

लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Rikhav Securities share price: लिस्टिंगसह या शेअरनं १००% नफा दिला. पाहा कोणता आहे हा शेअर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:00 IST2025-01-22T13:00:58+5:302025-01-22T13:00:58+5:30

Rikhav Securities share price: लिस्टिंगसह या शेअरनं १००% नफा दिला. पाहा कोणता आहे हा शेअर.

Rikhav Securities share price rose 100 percent within minutes of listing investors money doubled on the first day | लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल

लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Rikhav Securities share price: रिखव सिक्युरिटीजचा आयपीओ बुधवारी बीएसईवर लिस्ट झाला. बीएसई एसएमईवर कंपनीचा शेअर ९०% प्रीमियमसह १६३.४० रुपयांवर लिस्ट झाला. त्याचा आयपीओची किंमत ८६ रुपये होती. लिस्टिंगनंतर रिखव सिक्युरिटीजच्या शेअरचा भाव ५ टक्क्यांनी वाढून १७१.५७ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच लिस्टिंगसह शेअरनं १००% नफा दिला.

आयपीओला उत्स्फुर्त प्रतिसाद

रिखव सिक्युरिटीजचा आयपीओ १५ जानेवारीरोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. १७ जानेवारीला हा इश्यू बंद झाला. रिखव सिक्युरिटीजचा आयपीओ ३०० हून अधिक पट बुक करण्यात आला. किरकोळ श्रेणीसाठी २५१ पेक्षा अधिक पट बोली लागली. नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर (एनआयआय) सेगमेंटला ६०० पटीहून अधिक सब्सक्राइब करण्यात आलं. एनआयआयला १४.८ लाख शेअर्सच्या वाटपाच्या तुलनेत ९१ कोटींहून अधिक शेअर्ससाठी निविदा मिळाल्या. या आयपीओमध्ये ८३ लाख शेअर्सची फ्रेश इक्विटी विक्री आणि २० लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश होता.

कंपनीची योजना काय?

आयपीओमधून जमा होणारी रक्कम वाढीव कार्यशील भांडवलाच्या गरजा, आयटी सॉफ्टवेअर, कम्प्युटर्स आणि लॅपटॉप यासाठीच्या भांडवली खर्चातील गुंतवणूक आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल. रिखाव सिक्युरिटीज इक्विटी ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग अॅक्टिव्हिटीजमध्ये काम करते. त्याच्या सेवांमध्ये इक्विटी ब्रोकिंगसारख्या विविध आर्थिक बाबींचा समावेश आहे. यामध्ये कंपनी कॅश डिलिव्हरी, इंट्रा-डे ट्रेडिंग, फ्युचर्स आणि ऑप्शन ऑफर करते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Rikhav Securities share price rose 100 percent within minutes of listing investors money doubled on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.