richest women in asia : आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. व्यवसाय, तंत्रज्ञान, विज्ञान, कला अशा कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे रोशनी नादर. जेव्हा त्या एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा बनल्या, तेव्हा केवळ एचसीएलसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः महिलांसाठी ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. या बिझनस वुमनने आता अंबानी कुटुंबालाही मागे टाकलं आहे.
रोशनी नादर देशातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या मते, एचसीएल ग्रुपचे संस्थापक शिव नादर यांनी त्यांची मुलगी रोशनी नादर यांना एचसीएलमधील ४७ टक्के हिस्सा दिला आहे. हा हिस्सा मिळवल्यानंतर, रोशनी कंपनीतील सर्वात मोठ्या शेअरहोल्डर बनल्या आहेत. यानंतर त्या एका रात्रीत आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, रोशनी जगातील पाचव्या क्रमांकाची श्रीमंत महिलाही बनली आहे.
नेटवर्थमध्ये अंबानी कुटुंबालाही टाकलं मागेनेटवर्थ संपत्तीच्या बाबतीत, रोशनी यांनी अंबानी कुटुंबाला तगडी स्पर्धा दिली आहे. इथे आपण मुकेश अंबानींबद्दल बोलत नाही तर त्यांची पत्नी नीता अंबानींबद्दल तुलना करत आहोत. अहवालांनुसार, २०२४ मध्ये नीता अंबानींची एकूण अंदाजे संपत्ती सुमारे २३४०-२५१० कोटी रुपये होती. पण रोशनी यांनी नीता अंबानींना संपत्तीच्या बाबत मागे टाकले आहे. यासोबत सावित्री जिंदाल आणि अझीझ प्रेमजी यांनाही मागे टाकले आहे. वास्तविक, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची एकूण संपत्ती रोशनीपेक्षा खूप जास्त आहे. रोशनी त्यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
वाचा - चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय?
रोशनी नादर यांची संपत्ती किती?ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडियाच्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८८.१ अब्ज डॉलर आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ६८.९ अब्ज डॉलर आहे. यानंतर रोशनी नादर यांचे नाव येते, त्यांची एकूण संपत्ती ३५.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ३१,३०,३१,३४,६७,०८० रुपये झाली आहे. शिव नादर यांनी रोशनी यांना आपलं उत्तराधिकारी घोषित केलं आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर रोशनी देशातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनली आहे. जर आपण नीता अंबानी यांच्या अंदाजे संपत्तीची तुलना केली तर त्यांनी त्यांना मागे टाकले आहे. परंतु, अंबानी कुटुंबाची संयुक्त संपत्ती रोशनी यांच्यापेक्षा खूप जास्त आहे.