Lokmat Money >शेअर बाजार > १३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सनं बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:29 AM2024-02-06T11:29:31+5:302024-02-06T11:30:14+5:30

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सनं बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Rs 135 share 300 par on first day investors huge profit A solid gain of 129 percent BLS E Services ipo | १३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

बीएलएस ई-सर्व्हिसेसच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सनं बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. बीएलएस ई सर्व्हिसेसचे (BLS E Services) शेअर्स 129 टक्क्यांच्या वाढीसह 309 रुपयांवर शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये  गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 135 रुपयांना अलॉट झाले होते. कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सुमारे 126 टक्क्यांच्या च्या प्रीमियमसह 305 रुपयांवर लिस्ट झालेत.
 

लिस्टिंगनंतरही तुफान तेजी
 

लिस्टिंगनंतर लगेचच, बीएलएस ई सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. कंपनीचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक वाढीसह 333.95 रुपयांवर पोहोचला. बीएलएस या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. बीएलएस ई-सर्व्हिसेसचा आयपीओ 30 जानेवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि 1 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार होता. कंपनीच्या आयपीओची किंमत 129 ते 135 रुपये होती. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 135 रुपयांना अलॉट करण्यात आले. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकणार होते.
 

आयपीओ 162 पट सबस्क्राईब
 

बीएलएस ई सर्व्हिसेसचा आयपीओ एकूण 162.38 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत 236.53 पट सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच वेळी, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा (NII) 300.05 पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) कोटा 123.30 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, इतर श्रेणीमध्ये आयपीओ 15.30 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार 310.91 कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Rs 135 share 300 par on first day investors huge profit A solid gain of 129 percent BLS E Services ipo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.