Lokmat Money >शेअर बाजार > ₹14 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला 2700% परतावा

₹14 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला 2700% परतावा

मार्च 2020 नंतर, हा लॉजिस्टिक स्टॉक BSE वर ₹14.50 वाढून ₹404 वर पोहोचला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:21 PM2023-08-07T17:21:48+5:302023-08-07T17:23:16+5:30

मार्च 2020 नंतर, हा लॉजिस्टिक स्टॉक BSE वर ₹14.50 वाढून ₹404 वर पोहोचला आहे. 

rs 14 jtl industries share delivered 2700 percent return | ₹14 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला 2700% परतावा

₹14 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला 2700% परतावा

ज्या शेअर्सनी कोरोना नंतरच्या शेअर बाजारातील रिबाउंडमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला, अशा शेअर्सपैकी एक म्हणजे, जेटीएल इंडस्ट्रीजचा शेअर (JTL Industries). मार्च 2020 नंतर, हा लॉजिस्टिक स्टॉक BSE वर ₹14.50 वाढून ₹404 वर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने जवळपास 2,700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जेटीएल इंडस्ट्रीजची शेअर प्राइस आज वृद्धीसह खुली झाली आणि एनएसईवर ₹404 च्या नव्या उच्चांकावर पोहोचला.

एक्सपर्टनं दिला 'बाय' टॅग -
आर्थिक वर्ष 2023-24 साठी Q1 परिणामांच्या घोषणेनंतर, अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने गेल्या तीन वर्षांत 2,700 टक्के वृद्धी होऊनही या मल्टीबॅगर स्टॉकला 'बाय' टॅग दिला आहे. अ‍ॅक्सिस सिक्योरिटीज रिसर्च रिपोर्टनुसार, मल्टीबॅगर स्टॉक दीर्घ काळात ₹470 प्रति शेअरवर पोहोचू शकतो.

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजनं काय सांगितलं? - 
अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे, "आमचा FY24 साठी EBITDA अंदाज 3% आहे, जो Q1FY24 च्या कमी संख्येस जबाबदार आहे. मात्र, FY25/26 च्या अंदाजात आमच्या 27 जून'23 च्या सुरुवातीच्या नोंदीच्या तुलनेत फारसा बदल करण्यात आलेला नाही." ब्रोकरेजने पुढे सांगितले, अपेक्षेपेक्षा अधिक इन्व्हेंटरी हानीमुळे JTL इंडस्ट्रीज (JTL) चा EBITDA अंदाज चुकला. ₹505 कोटींचा महसूल (YoY/QoQ पेक्षा 37%/7% अधिक) ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार राहिले. तसेच, "आम्ही स्टॉकवर आमचे बाय रेटिंग कायम ठेवतो. पुढील एका वर्षात ₹470 टार्गेट प्राइसवर पोहोचण्यासाठी आम्ही JTL ला 22x वर व्हॅल्यू देतो. ही FY25 EPS (अपरिवर्तित) आहे." 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: rs 14 jtl industries share delivered 2700 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.