सज्जन जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्ल्यूने इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पासाठी मोठी डील केली आहे. दरम्यान, समूह ओडिशामध्ये ४०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी जेएसडब्ल्यू समूहानं ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू समूह कटक जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि कम्पोनन्ट्स निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. याशिवाय जगतसिंगपूर जिल्ह्यातील पारादीप येथे कॉपर स्मेल्टर आणि लिथियम रिफायनरी उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं या दोन प्रकल्पांसाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज मंजूर केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शेअरची कामगिरी
जेएसडब्ल्यू समूहाची एनर्जी कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीचे शेअर्स सध्या दबावाखाली आहेत. मात्र, तज्ज्ञांना याबाबत खात्री व्यक्त केली आहे. गेल्या शुक्रवारी शेअरची किंमत ४९९ रुपये होती. त्याच वेळी, शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ५२० रुपये आहे. ८ फेब्रुवारी रोजी या शेअरची किंमत वाढली होती. जर आपण तज्ज्ञांच्या अंदाजाबद्दल बोललो तर येत्या काही दिवसांत शेअरची किंमत ५४० रुपयांच्या पुढे जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. ब्रोकरेज जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीज लिमिटेडला स्टॉकमध्ये तेजी येण्याची शक्यता व्यक्त केलीये.
डिसेंबर तिमाहीचे निकाल
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत जेएसडब्ल्यू एनर्जीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा २८ टक्क्यांनी वाढून २३१ कोटी रुपये झालाय. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा १८० कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल १३ टक्क्यांनी वाढून २,६६१ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत २,३५० कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)