Sensex-Nifty slips amid Israel-Iran Conflict: इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या वातावरणात अमेरिकन आणि युरोपियन बाजार काहीशा प्रणामात स्थिर होत आहेत, तर दुसरीकडे बहुतेक आशियाई बाजारांवर विक्रीचा दबाव आहे. देशांतर्गत शेअर बाजाराबद्दल बोलायचं झालं तर येथेही विक्रीचा दबाव असून इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून येतेय. मेटल वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप ५.६२ लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.६२ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स कामकाजाच्या सुरुवातीला ८०८.५० अंकांनी म्हणजेच ०.९६ टक्क्यांनी घसरून ८३,४५७.७९ वर आणि निफ्टी ५० २५०.७५ अंकांनी म्हणजेच ०.९७ टक्क्यांनी घसरून २५,५४६.१५ वर बंद झाला. गेल्या महिन्यात निफ्टीने २५,२५० अंकांची पातळी ओलांडली होती, त्यानंतर सेन्सेक्सही ८६००० च्या जवळ आला होता0. पण त्यानंतर आता सेन्सेक्स ८३०५० आणि निफ्टी २५६०० पर्यंत खाली आला आहे.
५.६२ लाख कोटी बुडाले
एक दिवस आधी म्हणजे १ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,७४,८६,४६३.६५ कोटी रुपये होतं. आज ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,६९,२३,६६३.५९ कोटी रुपयांवर आला. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या भांडवलात ५,६२,८००.०६ कोटी रुपयांची घट झाली आहे.
ग्रीन झोनमध्ये सेन्सेक्सचा एकच शेअर
सेन्सेक्सवर लिस्टेड ३० शेअर्सपैकी केवळ एक जेएसडब्ल्यू स्टील ग्रीन झोनमध्ये आहे. दुसरीकडे एशियन पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले. खाली आपण सेन्सेक्सवर लिस्टेड सर्व शेअर्सच्या ताज्या किंमती आणि आजच्या चढउतारांचा तपशील पाहू शकता.