Lokmat Money >शेअर बाजार > या 5.60 रुपयांच्या पेनी स्टॉकने दिला दमदार परतावा; 1 लाखाचे केले 7 कोटी

या 5.60 रुपयांच्या पेनी स्टॉकने दिला दमदार परतावा; 1 लाखाचे केले 7 कोटी

Multibagger Penny Stock: आजच्या व्यवहारात या स्टॉकमध्ये 13% वाढ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:56 IST2025-03-04T19:55:15+5:302025-03-04T19:56:47+5:30

Multibagger Penny Stock: आजच्या व्यवहारात या स्टॉकमध्ये 13% वाढ.

Rs 5.60 penny stock gave strong returns; 1 lakh turned into 7 crores | या 5.60 रुपयांच्या पेनी स्टॉकने दिला दमदार परतावा; 1 लाखाचे केले 7 कोटी

या 5.60 रुपयांच्या पेनी स्टॉकने दिला दमदार परतावा; 1 लाखाचे केले 7 कोटी

Multibagger Penny Stock: शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो मालामाल करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. हा स्टॉक वाडीलाल इंडस्ट्रीजचा आहे, ज्याने गेल्या 21 वर्षात 73686 % परतावा दिला आहे.

सध्या कंपनीचे शेअर 4300 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या 21 वर्षांत या स्टॉकच्या किंमतीत 72686 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकेकाळी वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत 5.60 रुपयांच्या पातळीवर होती. तेव्हापासून या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 738 पटीने वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 21 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांचा परतावा आतापर्यंत 7.37 कोटी रुपये झाला आहे. 

आज 13% वाढ
बीएसईमध्ये आज कंपनीचे शेअर्स 3784 रुपयांच्या पातळीवर उघडले. दिवसभरात कंपनीच्या शेअरने 4310 रुपयांची पातळी गाठली. बाजार बंद होताना शेअर 13 टक्क्यांनी वाढून 4281.45 रुपयांवर आला. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5139.80 रुपये होता, तर 52 आठवड्यांची नीचांक 3173 रुपये आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3077.43 कोटी रुपये आहे.

3 वर्षांपासून मिळतोय लाभांश 
या शेअरने 2022 मध्ये गुंतवणूकदारांना 1.25 रुपयांचा लाभांश दिला होता. तर, 2023 मध्ये एका शेअरवर 1.50 रुपये लाभांश दिला होता. कंपनीने 2024 मध्येही 1.50 रुपये लाभांश दिला होता.

(टीप- हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन असतो. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या.)

Web Title: Rs 5.60 penny stock gave strong returns; 1 lakh turned into 7 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.