कधीकाळी देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या रांगेत बसणाऱ्या अनिल अंबानी यांच्या बहुतेक लिस्टेड कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहेत. प्रचंड कर्ज आणि इतरही काही मोठ्या समस्यांमुळे अनिल अंबानी यांच्या काही कंपन्यांचे शेअर्स तर अक्षरशः ९९ टक्के अथवा त्याहूनही अधिक घसरले आहेत. हे शेअर्स अगदी पेनी स्टॉकच्या श्रेणीत आले आहेत. या पेनी स्टॉकची अचानक खरेदी होते आणि किंमत अपर सर्किटला जाते. असाच एक पेनी स्टॉक आहे रिलायन्स होम फायनान्सचा.
हाऊसिंग फायनान्स कंपनी रिलायन्स होमच्या शेअरची किंमत 3.34 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरची जबरदस्त खरेदी होत आहे. बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर अपर सर्किटवर पोहोचला आणि किंमत 3.52 रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, नफेखेरी बघायला मिळाली आणि शेअरचा भाव 3.24 रुपयांपर्यंत कोसळला. महत्वाचे म्हणजे, 13 एप्रिल 2023 रोजी या शेअरने 3.97 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकाला स्पर्श केला. 17 ऑगस्टला या शेअरची किंमत 1.61 रुपयांच्या नीचांकावर होती.
बीएसई इंडेक्सनुसार, या शेअरने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत 85 टक्के परतावा दिला आहे. तर, एका महिन्याचा परतावा 71.28 टक्के होता. तसेच, अवघ्या दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. खरे तर, काही वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 110 रुपयांवर पोहोचली होती. अशा प्रकारे, हा स्टॉक आतापर्यंत 99 टक्के घसरला आहे.
सप्टेंबर तिमाहीतील निकाल -
सप्टेंबर तिमाहीदरम्यान रिलायन्स होम फायनान्सच्या नेट सेल्समध्ये 99.78% ची घसरण झाली आणि तो 0.16 कोटी रुपयांवर आला. एक वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत तो 72.27 कोटी रुपयांवर होता. तिमाही दरम्यान नेट लॉस 0.67 कोटी रुपये होता. एक वर्षापूर्वीच्या समान कालावधीच्या तुलनेत 99.59% ची घसरण नोंदवण्यात आली. EBITDA संदर्भात बोलायचे झाल्यास, निगेटिव्हमध्ये 0.67 कोटी रुपये होता. हे एक वर्षापूर्वीच्या 33.38 कोटी रुपयांपेक्षा 102.01% कमी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)