Lokmat Money >शेअर बाजार > ₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 01:27 PM2023-08-26T13:27:32+5:302023-08-26T13:30:07+5:30

यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे.

rs1.3 multibagger share uy fincorp gave 2200 percent return | ₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

₹1.3 च्या मल्टीबॅगर शेअरची कमाल अन् गुंतवणूकदारांची धमाल, दिला 2200 टक्क्यांचा परतावा!

शेअर बाजारात सध्या यूवाय फिनकॉर्प या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीची जबरदस्त चर्चा सुरू आहे. या कंपनीचा शेअर कोविड-19 दरम्यानच्या निचांकी पातळीच्या तुलनेत आपल्या दलाल स्ट्रीटवर जबरदस्त परतावा देत आहे. गेल्या 40 महिन्यांत या शेअरमध्ये 2,200 टकक्यांहून अधिकची तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

यूवाय फिनकॉर्पचा शेअर शुक्रवारी 29 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटींहून अधिक आहे. एप्रिल 2020 मध्ये हा शेअर 1.3 रुपयांच्या जवळपास होता. तेव्हापासून आतापर्यंत या शेअरने तब्बल 2200 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीने आपल्या 52-आठवड्यांतील निचांकीपातळीपेक्षाही 160 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने ANS डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (ADPL) मध्ये आपल्या संपूर्ण इक्विटी स्टेकच्या निर्गुंतवणुकीची घोषणा केली होती. कंपनीकडे एडीपीएलमध्ये 32,00,000 इक्विटी शेअर अथवा 14.13 टक्के एवढा वाटा आहे. जो गोल्डन गोएंका क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेडला शेअर खरेदी कराराद्वारे (एसपीए) विकला जाईल.

यूवाय फिनकॉर्पने ADPL मधील आपले सर्व शेअर्स गोल्डन गोएंका क्रेडिट (GGCPL) ला विकण्यास सहमती दर्शवली आहे. एक्सचेन्ज फायलिंग मध्ये म्हण्यात आले आहे की, हे मूल्यांकन 31 मार्च, 2023 पर्यंत एडीपीएलच्या वित्तीय विवरणावर आधारित आहे. नव्या मूल्यांकनानुसार, ADPL च्या प्रत्येक शेअरचे मुल्य 253.88 रुपये आणि एकूण वाटा 81.24 कोटी रुपये आहे. केवळ दोन वर्षांतच कंपनीची गुंतवणूक 10 पटींहून अधिक झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

 

 

 

Web Title: rs1.3 multibagger share uy fincorp gave 2200 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.