Join us

'या' IPO ची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री, ₹६३ वर आलेला आयपीओ; पहिल्याच दिवशी ९०% चा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:23 AM

कंपनीच्या आयपीओचं आज 15 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं आहे.

Rudra Gas Enterprise IPO: एसएमई कंपनी रुद्र गॅस एंटरप्राइझचा आयपीओ आज 15 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं आहे. रुद्र गॅस एंटरप्राइझचे शेअर्स बीएसईवर 90 टक्क्यांच्या प्रीमियमसह 119.70 रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 63 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. रुद्र गॅस एंटरप्राइझ आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. गॅस कंपनीचा हा आयपीओ तीन दिवसांत 350.75 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा 286.62 पट तर किरकोळ गुंतवणूकदारांनी कोटा 404.38 पट सबस्क्राईब झाला होता. 

केव्हा ओपन झालेला आयपीओ 

रुद्र गॅस एंटरप्राइझचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी खुला झाला आणि सोमवार 12 फेब्रुवारी रोजी बंद झाला. रुद्रा गॅस एंटरप्राइझ आयपीओचा प्राइस बँड 63 प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. रुद्र गॅस एंटरप्राइझ आयपीओची लॉट साइज 2,000 शेअर्सची होती. कंपनीच्या शेअर्सचं वाटप मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. 

कंपनीबाबत माहिती  

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (RHP) कंपनी अनेक पायाभूत सुविधांशी संबंधित कामांमध्ये गुंतलेली आहे. कंपनीच्या प्राथमिक व्यावसायिक कामांमध्ये फायबर केबल नेटवर्क, गॅस वितरण नेटवर्क प्रकल्प आणि बांधकाम उपकरणं यांचा समावेश आहे. कंपनी म्युनिसिपल गॅस वितरक उद्योगाला सर्वसमावेशक उपाय पुरवते. ही फर्म नागरी कामे, पाइपलाइन बांधकाम, पाइपलाइन नेटवर्क ऑपरेशन आणि सिटी गॅस वितरणासाठी देखभाल यामध्ये प्रामुख्यानं काम करते. मंजुलाबेन सुरेशभाई पटेल, कुश सुरेशभाई पटेल आणि कश्यप सुरेशभाई पटेल हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. रुद्र गॅस एंटरप्राइझमध्ये एकूण 14.16 कोटी रुपयांच्या 22,48,000 इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार