Lokmat Money >शेअर बाजार > 1 च्या बदल्यात 6 मिळतील! 'या' शेअरच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹180 वरून ₹780 वर पोहोचला भाव; लागले अप्पर सर्किट

1 च्या बदल्यात 6 मिळतील! 'या' शेअरच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹180 वरून ₹780 वर पोहोचला भाव; लागले अप्पर सर्किट

या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 6:1 च्या रेशोमध्ये बोनस इश्यूची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 09:11 PM2022-11-15T21:11:38+5:302022-11-15T21:13:39+5:30

या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 6:1 च्या रेशोमध्ये बोनस इश्यूची घोषणा केली आहे.

Rush to buy g m polyplast shares stock surges to ₹780 from ₹180 | 1 च्या बदल्यात 6 मिळतील! 'या' शेअरच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹180 वरून ₹780 वर पोहोचला भाव; लागले अप्पर सर्किट

1 च्या बदल्यात 6 मिळतील! 'या' शेअरच्या खरेदीसाठी उडाली झुंबड, ₹180 वरून ₹780 वर पोहोचला भाव; लागले अप्पर सर्किट

स्मॉल-कॅप स्टॉक जीएम पॉलीप्लास्टच्या (G M Polyplast) गुंतवणूकदारांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 6:1 च्या रेशोमध्ये बोनस इश्यूची घोषणा केली आहे. पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड डेटवर एका शेअरच्या बदल्यात 6 बोनस शेअर्स जारी केले जातील, असा याचा अर्थ आहे. जीएम पॉलीप्लास्ट प्लास्टिक प्रोडक्ट्स बनवणारी कंपनी आहे.

52 आठवड्यातील हायवर - 
मंगळवारी कंपनीचा शेअर, एक्सचेन्जवर 52 आठवड्यांतील नव्या उच्चांकावर बंद झाला. G M Polyplast च्या शेअने आज 5% च्या अपर सर्किटला टच केले आणि तो 787.85 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात या शेअरने 300% हून अधिकचा परतावा दिला आहे. या दरम्यान हा शेअर ₹180 वरून ₹780 वर पोहोचला आहे. अर्धात एका वर्षात गुंतवणूतदारांची संपत्ती चारपटीहून अधिक वाढली आहे. आता जीएम पॉलीप्लास्टने गुंतवणूकदारांसाठी 6:1 या रेशोत बोनस इश्यूची घोषणा केली आहे.

Q2FY23 मध्ये कंपनीने एका वर्षांपूर्वीच्या याच कालावधीत ₹1.76 कोटींच्या लाभाच्या तुलनेत आता ₹2.53 लाख कोटी रुपयांचा स्टँडअलोन प्रॉफिट कमावला आहे. 2003 मध्ये सुरू झालेली ही कंपनी एचआयपीएस, एबीएस, पीईटी, पीपी, एचडीपीई शीट्स आणि प्रीमियम गुणवत्ता ग्रॅन्यूलच्या अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. जीएम पॉलीप्लास्टचे सिल्वासा येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि मुंबईत कार्यालय आहे.

Web Title: Rush to buy g m polyplast shares stock surges to ₹780 from ₹180

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.